संजय गडदे, मुंबई|ता. ५ डिसेंबर २०२३
तोतया इन्कम टॅक्स अधिकारी बनून व्यापाराच्या घरात धाड टाकून तब्बल 18 लाख रुपये लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईमधून समोर आला आहे. सायन पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी तब्बल आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. काय आहे हे नेमकं प्रकरण? जाणून घ्या सविस्तर.
याबाबत समोर आलेली माहिती अशी, काही दिवसांपूर्वी इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांचे कथित आयडी घालून काही जण सायन (Sion) येथील पटवा नावाच्या व्यापाराच्या घरी धडकले. धाडीच्या नावाखाली घरातील सगळे रोकड आणि संबंधित कागदपत्रे दाखवण्याच्या सुचना त्यांनी कुटुंबियांना दिल्या.
यावेळी पटवा नावाच्या या व्यापारी कुटुंबाने बहिणीच्या लग्नासाठी आणलेली असलेली तब्बल 18 लाख रुपयांची रोकड या 'अधिकाऱ्यां' समोर ठेवली. या बनावट अधिकार्यांनी नंतर कागदपत्रे तपासण्याचा बनावट केला, पैश्यांचे फोटो काढले आणि काही दिवसातच तपास पूर्ण करू मात्र तोवर कॅश जप्त करत असल्याच त्यांनी सांगितले आणि १८ लाख रूपये घेऊन पसार झाले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या कारवाईनंतर चार दिवस उलटून देखील जेव्हा काहीच झालं नाही तेव्हा कुटुंबाने चौकशी केली तेव्हा ही सगळी बनावट असल्याच समोर आले आणि त्यांनी तात्काळ सायन पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ तपासची चक्र फिरवली इमारतीतील तसेच परिसरातून सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) तपासण्यास सुरुवात केली.
त्यांना या आरोपींच्या गाडीचा नंबर मिळाला आणि याच पुराव्याचा आधार घेत एक एक करून आठही आरोपींना पोलिसांनी अटक केली. तपासात कुटुंबातील एकाचा मित्राला घरातील लग्नाची तसेच घरात असलेल्या कॅशची माहिती होती आणि त्यानेच आरोपींना टीप दिल्याचे समोर येताच या मित्राला देखील पोलिसांनी अटक केली. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.