Sion Hospital News: सायन रुग्णालयात लवकरच १२०० खाटा, कायापालट नेमका कसा होणार? CM शिंदेंनी सविस्तर सांगितलं

Eknath Shinde Visits Sion Hospital: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सायन रुग्णालयला भेट दिली आहे. यावेळी त्यांनी काही मोठे निर्णय घेतले आहेत.
eknath-shinde
eknath-shindesaam tv news
Published On

Eknath Shinde Visits Sion Hospital:

तुम्हाला रुग्णालयात औषधे मिळतात का..बाहेरून आणावी लागत नाही ना..ट्रीटमेंट कशी सुरू आहे..वेळेवर जेवण मिळते ना..सायन हॉस्पीटलमधील रुग्णांशी आणि त्यांच्या नातेवाईकांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधलेला हा संवाद..आज महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली.

त्यावेळी त्यांनी सर्वसाधारण वॉर्ड, ट्रॉमा आयसीयु, वॉर्ड क्रमांक चार येथे पाहणी करताना रुग्णांची विचारपूस केली आणि दिलासाही दिला. यावेळी त्यांनी रुग्णालयाच्या स्वयंपाक गृहाला अचानक भेट देऊन तेथील अन्नपदार्थांची पाहणी केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सायन हॉस्पीटलमध्ये २०० खाटांचा अतिदक्षता विभाग आणि एक हजार खाटांचा सर्वसाधारण कक्षाचे काम सुरू असून लवकरच ते पूर्ण होईल त्यामुळे नव्याने १२०० खाटा उपलब्ध होतील, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

मुंबईच्या सखोल स्वच्छता मोहिमेच्या शुभारंभासाठी आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयाला साकाळी सातच्या सुमारास भेट दिली.

सायन रुग्णालयात सुरू असलेल्या इमारतींच्या कामाला गती द्यावी. पुढच्या भेटीत कामाची प्रगती झाली पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी याभेटी दरम्यान निर्देश दिले आहेत. रुग्णालयात सोयीसुविधा वाढविण्यात येत असून त्या कालमर्यादेत पूर्ण कराव्यात आणि रूग्णांना वेळेत आरोग्यसेवा मिळण्याबाबत रुग्णालय प्रशासनाने प्रयत्न करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. (Latest news in marathi)

eknath-shinde
Ajit Pawar on Telanagna Assembly Election News: तेलंगणातील काँग्रेस विजयावर अजित पवारांचं सूचक विधान

रुग्णालयाची पाहणी करून तेथील रुग्णांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. उत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचही त्यांनी यावेळी सांगितलं. याबरोबरच त्यांनी रुग्णालयातील सामान्य विभागासह अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या रुग्णांशी संवाद साधला. रुग्णांना मिळत असलेल्या उपचारांची माहितीही त्यांनी घेतली. रुग्णांची गैरसोय होतेय का याविषयी देखील मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतले.

डायलेसिस सेवा आणि सोनोग्राफी देण्यासाठी उपकरणांची वाढ करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये झिरो प्रिस्क्रीप्शन संकल्पना राबविण्यासाठी प्रयत्न करावेत जेणेकरून औषधांसाठी रुग्णांना बाहेर जावे लागणार नाही. असे मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.

eknath-shinde
Who Will Be CM of Rajasthan: UP नंतर राजस्थानमध्येही 'योगी' होणार मुख्यमंत्री; अनेक वर्षांच्या राजकीय तपाचं फळ मिळणार?

भेटी दरम्यान मुख्यमंत्र्यांनी सायन रुग्णालयाचा परिसर पिंजून काढला. प्रत्येक वॉर्डात जाऊन त्यांनी माहिती घेतली. उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे कौतुक करतानाच रुग्णाला वेळेवर जेवण,औषध मिळेल यासाठी प्रशासनाला सूचना केल्या.

रुग्णालयाच्या स्वयंपाक गृहाची पाहणी करताना तेथील साफसफाई आणि अन्नाची गुणवत्ता याबाबतही त्यांनी सूचना केल्या. मुख्यमंत्री रुग्णालयात पाहणीसाठी आले याचा रुग्णांच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद होता. एका रुग्णाने चक्क मुख्यमंत्र्यांसोबत सेल्फीही घेतली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com