Sion Car Accident: रस्ता ओलांडताना वृद्ध महिलेला कारने उडवलं; अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Mumbai Car Accident News: काळजात धडकी भरवणारा अपघात पाहून तुमच्याही अंगावर शहारे येतील.
Sion Car Accident
Sion Car AccidentSaam TV
Published On

Accident News:

रस्ता क्रॉस करत असताना एका महिलेला कारने धडक दिली आहे. या धडकेत महिलेचा मृत्यू झाला आहे. अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. काळजात धडकी भरवणारा अपघात पाहून तुमच्याही अंगावर शहारे येतील. (Latest Marathi News)

Sion Car Accident
Erandol Accident News : महामार्गावर उभ्या ट्रकला दुचाकीची धडक; तरुणाचा जागीच मृत्यू

१० सप्टेंबर रोजी हा अपघात घडला. अपघातात मृत पावलेल्या वद्ध महिलेचे नाव पुष्पा केणी असे असून त्या ७३ वर्षांच्या होत्या. रस्ता क्रॉस करत असतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, महिला रस्त्याच्या दुसऱ्या कडेला आहे. बरेच पुढे जाऊन तिने रस्ता ओलांडलाय.

रस्ता ओलांडताना येथे बरीच वाहने भरधाव वेगात धावत आहेत. वाहनांमधून महिलेने कसाबसा रस्ता काढलाय. ती रस्त्या ओलांडून फुटपाथवर जाणार तोच मागून एक कार भरधाव वेगात आली. या करची महिलेला फार जोरात धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की महिला थेट रस्त्यावर हवेत वर फेकली गेली आणि रस्त्यावर खाली धाडकन आदळली.

अपघात झाल्याचं समजताच वाहन चालकाने कार थांबवली. या अपघातानंतर रस्त्यावर एकच गर्दी झाली. ज्या व्यक्तीच्या कारची धडक बसली होती त्याने महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात गेल्यावर डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले.

या अपघाताची माहिती महिलेच्या कुटुंबियांना देण्यात आली तेव्हा महिला कार समोर चक्कर येऊन पडली असं कार चालकाकडून सांगण्यात आलं होतं. कारमधील व्यक्ती खोटं बोलत असल्याचा संशय कुटुंबियांना आला. त्यामुळे त्यांनी रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा हा अपघात असल्याचं समजलं.

याबाबत कुटुंबियांनी सायन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. भारतीय दंड संहितेच्या कलम 279, 337, 338, 304 (ए) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलमांखाली सायन पोलिस ठाण्यात गुन्हा कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Sion Car Accident
Nashik Accident News: गणपती आणायला गेलेल्या भाविकांना कारची जोरदार धडक; ५ ते ६ गणेशभक्त जखमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com