Erandol Accident News : महामार्गावर उभ्या ट्रकला दुचाकीची धडक; तरुणाचा जागीच मृत्यू

Jalgaon Erandol News : महामार्गावर उभ्या ट्रकला दुचाकीची धडक; तरुणाचा जागीच मृत्यू
Erandol Accident News
Erandol Accident NewsSaam tv

एरंडोल (जळगाव) : महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकचा अंदाज न आल्याने भरधाव वेगाने येणारी दुचाकी (Jalgaon) ट्रकला मागून धडकली. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेला सहकारी गंभीर जखमी झाला. (Accident) सदर घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. (Maharashtra News)

Erandol Accident News
Eco-Friendly Ganpati साकारुन 'वीर मराठा' ने सामाजिक बांधिलकी जाेपासात समाजापुढे ठेवला आदर्श

एरंडोल जवळ महामार्ग सहावर हा अपघात झाला आहे. यात जालना जिल्ह्यातील योगेश निवृत्ती वानखेडे तर सोबत त्यांचा मित्र भगवान पांडुरंग सोनवणे हे दुचाकीने पारोळ्याकडून जळगावकडे जात होते. दरम्यान रात्री दहाच्या सुमारास एरंडोल (Erandol) येथे रस्त्यावर चुकीच्या दिशेने ट्रक उभा होता. रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकचा अंदाज न आल्याने भरधाव दुचाकीने ट्रकच्या मागील बाजूने जोरदार धडक दिली. यामुळे दुचाकीवरील दोन्ही तरुण रस्त्यावर फेकले गेले. यात दुचाकीचालक योगेश वानखेडे यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे सहकारी भगवान सोनवणे हे जखमी झाले. 

Erandol Accident News
Maval News : भात शेतीतून बाप्पाला प्रदक्षिणा; पिकात वाढ होत असल्याची शेतकऱ्यांची भावना

अपघाताचा आवाज येताच आजूबाजूचे नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू करून जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी त्वरित अपघातस्थळी पोचून वाहतूक सुरळीत केली. ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांना तपासले असता योगेश वानखेडे मृत घोषित केले. ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी अपघातात गंभीर झालेल्या तरुणाकडून माहिती घेऊन मृताच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांना अपघाताची माहिती दिली. मृत योगेश वानखेडे हा पूर्वी औषध विक्रीच्या दुकानावर कामाला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com