देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येत आहे. ट्रेंड्सनुसार भाजप ४ पैकी ३ राज्यात सत्ता काबीज करताना दिसत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या या विजयाचं श्रेय पेतंप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं आहे. जनतेने निवडणुकीत मोदींना साथ दिली आहे. घर घर मोदीनंतर आता ते मन मन मोदी झाले आहेत, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा आणि देशासाठी केलेलं काम तसेच अमित शाहा यांचं नियोजन भारतीय जनता पार्टीला यश देऊन गेलं आहे. या निवडणुकीला मन मन मे मोदी असा निकाल आपण 4 राज्यांच्या निवडणुकांमध्ये पहिला. या निवडणुकीत भाजप पराभूत होईल असं काहीजण बोलत होते, मात्र हा निकाल जनतेच्या हातात असतो, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. (Latest Marathi News)
जनतेने निवडणुकीत मोदींना साथ दिली. या तीन राज्यांमध्ये मोठ्या संख्येने भाजप आणि एनडीएला यश मिळालं. राहुल गांधी यांनी भारत जोडी नाही भारत तोडो यात्रा केली केली. परदेशात जाऊन बदनामी केली. राजस्थानमध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू असं आश्वासन राहुल गांधी यांनी दिलं होतं, मात्र ते पाळलं नाही, अशी टीकाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. (Rajasthan Assembly Election 2023 Results LIVE)
कर्नाटकमध्ये धोका देऊन निवडून आले. मात्र जनता सुज्ञ आहे. मोदींचा विजय, विचारांचा विजय झालेला आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये विरोधकांना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. ही लोकसभेची सेमीफायनल नाही फायनल झाली. 2024 ला आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड पंतप्रधान नरेंद्र मोदी मोडतील आणि निवडून येतील, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.