Shiv Sena Mla Disqualification case: ई-मेल आयडीवरून खडाजंगी; ठाकरे गटाकडून पुराव्यांसह उत्तर सादर

Shiv Sena Mla Disqualification case: ठाकरे गटाकडून उत्तर दाखल करत असताना 20 जून 2022 रोजीच्या महाराष्ट्र विधानसभा सदस्यांची यादी पुस्तिका आपल्या उत्तरांमध्ये सादर केली आहे.
Shiv Sena Mla Disqualification case
Shiv Sena Mla Disqualification caseSaam TV
Published On

Shivsena MLA Disqualification:

शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. या सुनावणीत सध्या शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलट तपासणी करत आहेत. अशात गेल्या ३ दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ई-मेल आयडीवरून वाद रंगला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Shiv Sena Mla Disqualification case
Shivsena News: महेश जेठमलानींचे कोंडी करणारे सवाल, सुनील प्रभू अडखळले; शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी अंतिम टप्प्यात

बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश ज्या ई-मेल आयडीवर दिले तो आयडी एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) नसल्याचा दावा जेठमलानी यांनी केलाय. त्यांच्या या दाव्याला प्रत्युत्तर देत ठाकरे गटाच्या वकिलांनी थेट पुराव्यांसह उत्तर सादर केलं आहे.

ठाकरे गटाकडून उत्तर दाखल करत असताना 20 जून 2022 रोजीच्या महाराष्ट्र विधानसभा सदस्यांची यादी पुस्तिका आपल्या उत्तरांमध्ये सादर केली आहे. ज्यामध्ये राज्यातील सर्व आमदारांचे नाव, पत्ता, फोन नंबर आणि त्यासोबतच ईमेल आयडी आहेत. या पुस्तिकेमध्ये एकनाथ शिंदे यांचा ईमेल आयडी eknath.shinde@gmail.com हा आहे.

सुनावणी दरम्यान एकनाथ शिंदे यांचा ईमेल आयडीच अस्तित्वात नसल्याचा जेठमलानींनी दावा केला होता. तसेच 2023 च्या पुस्तिकेमधील आमदारांच्या माहितीचा संदर्भ देत एकनाथ शिंदे यांचा ईमेल आयडी हा ministereknathshinde@ gmail.com असल्याचं म्हटलं होतं. मात्र यावर ठाकरे गटाच्या वकिलांनी थेट पुराव्यांसकट उत्तर सादर केलं आहे.

गेल्या ५ ते ६ दिवसांपासून सुनील प्रभू यांची उलटतपासणी होत आहे. त्यांच्या उलटतपासणीचा आजचा शेवटचा दिवस आहे. शिंदे गटाकडून महेश जेठमलानी तर ठाकरे गटाकडून देवदत्त कामत युक्तिवाद करत आहेत. या सुनावणी दरम्यान दोन दिवसांपूर्वी प्रभूंनी एकनाथ शिंदेंसह इतर आमदारांना बैठकीची माहिती कशी दिली असा सवाल केला होता. त्यावरून ई-मेल आयडीवरून वाद रंगला.

Shiv Sena Mla Disqualification case
Jitendra Awhad News: 'धमक होती तर नवीन पक्ष काढा, कर्तृत्व सिद्ध करा..' आव्हाडांचे अजित पवारांना थेट आव्हान; जुना VIDEO शेअर करत टीकास्त्र

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com