Mumbai Crime News  Saam Tv
क्राईम

Mumbai Crime News: सोशल मीडियावरील मैत्री पडली महाग; तरुणाकडून घरी बोलावून अल्पवयीन मुलीसोबत संतापजनक कृत्य, परिसरात खळबळ

Mumbai Crime News: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईत एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि विनयभंग करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी २० वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईत एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि विनयभंग करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी २० वर्षीय तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीसह त्याच्या चुलत भावालाही ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी ही शाळेत जायची. काही आठवड्यांपूर्वी तिची २० वर्षीय आरोपीशी सोशल मीडिया अॅप स्नॅपचॅटवर भेट झाली. या अॅपवर त्या दोघांची मैत्री झाली. त्यानंतर या दोघांनी भेटण्याचा निर्णय घेतला.

१३ एप्रिलला आरोपीने पीडित मुलीला मुंबईत एका ठिकाणी बोलावले. आरोपीने तिला त्याच्या १६ वर्षीय चुलत भावाच्या घरी नेले. त्याच्या घरी कोणीच नसल्याने आरोपीने तिला तिथे नेले, असे पोलिसांनी सांगितले.

आरोपीने त्याच्या चुलत भावाच्या घरी नेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर तिथे उपस्थित आरोपीच्या भावाने पीडित मुलीचा विनयभंग केला, असेही पोलिसांनी सांगितले.

पीडित मुलीने हा संपूर्ण प्रकार तिच्या पालकांना सांगितला. पालकांनी याप्रकरणी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केला. याप्रकरणी मुलीने आपला जबाब नोंदवला असून आरोपी आणि त्याच्या चुलत भावाविरोधात आयपीसी आणि पॉक्सो कायद्याच्या कलमांअंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आली आहे.

याप्रकरणी रविवारी आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर अल्पवयीन मुलाला सुधारगृहात पाठवले जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apple कडून मोठा धमाका होणार; नव्या वर्षांत महत्वाची घोषणा करणार

भारतीय क्रिकेटपटूची बहीण लेस्बियन? नेमकं प्रकरण काय? चहर का भडकला?

Pune Navale Bridge Accident: ब्रेक फेल की घातकी ब्रीज? नवले पुलावरील अपघात कशामुळे झाला? दुर्घटनेबाबत RTO चा धक्कादायक अहवाल

Maharashtra Live News Update : नाशिक शहरातील इंदिरानगर बोगदा, मुंबई नाका, द्वारका परिसरात मोठी वाहतूक कोंडी

Surya Gochar 2026: शत्रूच्या राशीत सूर्याचा प्रवेश, २०२६मध्ये ४ राशींची पैशांची तंगी होणार दूर, मिळेल घवघवीत यश

SCROLL FOR NEXT