Pune Crime  Bangladeshi women Detained
Pune Crime Bangladeshi women Detained saam Tv

Pune Crime: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; बुधवारपेठेतून ४ बांगलादेशी महिला ताब्यात; १२ वर्षांपासून होतं वास्तव्य

Pune Crime : बुधवारपेठेत राहणाऱ्या बांगलादेशी महिलांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतलं आहे. या महिला कुंटणखान्यात तब्बल १२ वर्षांपासून बेकायदेशीरपणे राहत होत्या.
Published on

(सचिन जाधव, पुणे)

पुणे : बुधवारपेठेतील वेश्या वस्तीत बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी ४ बांगलादेशी महिलांना पुणे गुन्हे शाखेने ताब्यात घेतलं आहे. तर अन्य ५ महिलांविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव केल्याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून ही कारवाई करण्यात आलीय. तर अन्य पाच महिलांविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव केल्याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेल्या चार महिलांकडे भारतातील वास्तव्याची अधिकृत कागदपत्रे चौकशीत आढळून आली नाहीत. या चौघेही बुधवारपेठेतील कुंटणखान्यात मागील १२ वर्षांपासून राहत होत्या. पुणे गुन्हे शाखेला याची माहिती मिळाल्यानंतर शाखेने कुंटणखान्यात छापा टाकत ९ महिलांना ताब्यात घेतले. बांगलादेशी महिलांविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात पारपत्र अधिनियम आणि परकीय नागरिक आदेश कायद्यातील कलमान्वये गुन्हा दाखल केलाय.

मीरा रोडमध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना अटक

मिरा भाईंदर रोड मनी पॅलेस हॉटेलसमोर मीरा रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मॅकडोनालस हॉटेलजवळच, १ पुरुष आणि २ महिला वेश्या व्यवसाय करणाऱ्या प्रकरणी अटक केली होती. पोलीस पथकाने गुप्त माहितीच्या आधारे तपास केला. बोगस ग्राहक बनून मिरारोड मधल्या मॅकडोनाल्ड समोर मनी पॅलेस हॉटेलमध्ये पाठविण्यात आला.

पोलीस पथकाने सापळा रचून छापा टाकला. पोलिसांच्या या छाप्यात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली. एका पुरूष आणि २ महिला यांना मारहाण POCSO कायद्याच्या (IPC) विविध कलमांतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आलीय.

Pune Crime  Bangladeshi women Detained
Pimpri Chinchwad Crime : चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराकडूनच खून; पोलिस तपासात सत्य आले समोर, आरोपी ताब्यात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com