Pimpri Chinchwad Crime : चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराकडूनच खून; पोलिस तपासात सत्य आले समोर, आरोपी ताब्यात

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड परिसरातील या घटनेतील मयत महिला आणि आरोपीचा ज्ञानेश्वर गजानन इंगोले यांची काही दिवसांपूर्वी तोंड ओळख झाली होती.
Pimpri Chinchwad Crime
Pimpri Chinchwad CrimeSaam tv

पिंपरी चिंचवड : इंद्रायणी नदीच्या पुलाजवळील मोकळ्या जागेत एका महिलेच्या डोक्यावर दगडाने वार करून खून केला होता. (Pimpri Chinchwad) पिंपरी चिंचवड पोलिसांनी या घटनेची उकल केली असून प्रियकराने चारित्र्याच्या संशयावरून हा खून केल्याचे समोर आले आहे. (Maharashtra News)

Pimpri Chinchwad Crime
Pune Crime : पुणे हादरलं! शालेय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न; वाघोली भागातील शाळेतील प्रकार

पिंपरी चिंचवड परिसरातील या घटनेतील मयत महिला आणि आरोपीचा ज्ञानेश्वर गजानन इंगोले यांची काही दिवसांपूर्वी तोंड ओळख झाली होती. या ओळखीतून ज्ञानेश्वर इंगोले याचे मयत महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले होते. (Crime News) दरम्यान सदर महिलेने ज्ञानेश्वरला लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सदर महिला इतर काही पुरुष आणि मुलांसोबत बोलू लागल्याने ज्ञानेश्वर इंगोलेला तिच्या चारित्र्यावर संशय हेऊ लागला. त्या रागातूनच त्याने महिलेचा दगडाने ठेचून खून केला होता. 


('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pimpri Chinchwad Crime
Pune Crime : खरेदी करण्यासाठी आला अन् सोन्याची चैन घेवून झाला फरार; पुण्याच्या वाघोलीतील घटना

सदर महिलेच्या खुनाचा छडा लावण्यात (Pimpri Chinchwad Police) पिंपरी चिंचवड शहर पोलिसांना यश आला आहे. चारित्राच्या संशयावरनं महिलेच्या प्रियकराने तिचा दगडाने ठेचून खून केल्यास पोलीस तपासात निष्पन्न झाल आहे. या प्रकरणात सदर महिलेचा प्रियकर ज्ञानेश्वर गजानन इंगोले याला पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा तीन पोलीस पथकाने बेड्या ठोकल्या असून त्याच्या विरोधात दिघी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com