Mumbai Crime Saam Tv
क्राईम

Mumbai Crime: इंजेक्शन देऊन बोटं मोडायचे अन् बनावट वैद्यकीय अहवाल बनवायचे, मुंबई पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश

Fake Medical Reports Racket : मुंबईमध्ये बनावट वैद्यकीय अहवाल बनवणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Fake Medical Reports Racket Mumbai

मुंबई पोलिसांनी बनावट वैद्यकीय कागदपत्रे (Fake Medical Reports Racket) बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय. याप्रकरणी एका वॉर्ड बॉयसह चार आरोपींना अटक केली आहे. आरोपी इंजेक्शन देऊन लोकांची बोटे मोडायचा आणि नंतर रुग्णाला डॉक्टरकडे पाठवून बनावट वैद्यकीय अहवाल बनवायचा. त्यानंतर या वैद्यकीय अहवालांच्या आधारे पोलिसांत तक्रार करायचे, अशी माहिती पोलिसांनी दिलीय. (Crime News In Marathi)

बनावट वैद्यकीय कागदपत्रे बनवणाऱ्या रॅकेटचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी सिव्हिल हॉस्पिटलच्या वॉर्ड बॉयसह चौघांना अटक केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रॅकेटचा मुख्य सुत्रधार अटकेत

या रॅकेटचा मुख्य सुत्रधार वासू ठोंबरे होता. त्याने ही विचित्र पद्धत वापरली. तो प्रथम त्याच्या क्लायंटला बोटे तोडण्याआधी इंजेक्शन (Mumbai Crime) देत होता. नंतर रुग्णाला रुग्णालयात घेऊन जायचा. जिथे तो बोटाला झालेल्या दुखापतीचा उल्लेख करून वैद्यकीय कागदपत्रे तयार करायचा, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

लोकांकडून वासू ठोंबरे मोठ्या प्रमाणात पैसे गोळा करायचा. पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, जखमी व्यक्ती बनावट वैद्यकीय घेऊन पोलिसांकडे जायचा. नंतर जुन्या वैमनस्यामुळे त्याला मारहाण करण्यात (Fake Medical Reports Racket) आली, असे सांगत पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करायचा. वासू ठोंबरे, बाबू निसार सय्यद, समीर इश्तियाक हुसेन आणि अब्दुल हमीद खान अशी आरोपींची नावे आहेत. एका केससाठी ते 40 ते 50 हजार रुपये घेत होते.

'असा' झाला खुलासा

महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयात फैजान अहमद खान नावाच्या व्यक्तीच्या तुटलेल्या बोटांवर उपचार करताना संशयास्पद वाटलं. त्यानंतर वॉर्ड बॉयचा पर्दाफाश (Fake Medical Reports) झाला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय. यानंतर फैजानला पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. तेथे त्याने पोलिसांना संपूर्ण प्रकरण सांगितलं.

वॉर्ड बॉयने पोलिसांना सांगितलं की, त्याच्या गृहनिर्माण सोसायटीतील रहिवाशांच्या काही वादातून त्याला इतर तिघांना अडकवायचं होतं. या प्रकरणी पोलिसांनी रविवारी आयपीसीच्या कलम ३२८ आणि १२०बी अन्वये अटक केली (Mumbai Crime News) आहे. ही टोळी गेल्या अनेक महिन्यांपासून गुन्हे करत असल्याचा पोलिसांना संशय आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lunar Eclipse: वर्षातलं दुसरं चंद्रग्रहण कधी? यावेळी कोणत्या गोष्टी कराव्या, जाणून घ्या

Maharashtra Live News Update: मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर येथे वाहतूक कोंडी

उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद वाढली; काँग्रेस- ठाकरे गटातील कार्यकर्त्यांची एकनाथ शिंदेंना साथ

Election Commission: 'मतचोरीच्या खोट्या आरोपांना निवडणूक आयोग घाबरत नाही',: मुख्य निवडणूक आयुक्त

Vaishno Devi Yatra: वैष्णो देवीची यात्रा पूर्णपणे थांबवली, भाविकांना परत जाण्याचे आवाहन; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT