Pune Crime News: ऑनलाईन हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, राजस्थानी अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर पुणे पोलिसांची कारवाई

Pune Crime News: व्हॉट्सअपद्वारे (ऑनलाईन) चालवल्या जाणाऱ्या हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. राजस्थानी अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर त्यांच्याकडून मिळालेल्या एजंटच्या क्रमांकावरून सामाजिक सुरक्षा विभागाने पुन्हा कारवाई केली आहे.
Pune Crime News
Pune Crime NewsSaam Digital
Published On

Pune Crime News

व्हॉट्सअपद्वारे (ऑनलाईन) चालवल्या जाणाऱ्या हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. राजस्थानी अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर त्यांच्याकडून मिळालेल्या एजंटच्या क्रमांकावरून सामाजिक सुरक्षा विभागाने पुन्हा कारवाई केली आहे. बाणेरमधील दोन बड्या हॉटेलवर मध्यरात्री छापेमारी करत ११ मुलींची सुटका करण्यात आली असून एक नवी मुंबईची तर इतर परराज्यातील मुली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ दिवसांपूर्वी एका राजस्थानी अभिनेत्रीने व्हॉट्सअपद्वारे (ऑनलाईन) हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय सुरू असल्याची तक्रार दिली होती. तिने एका एजंटचा नंबरही पोलिसांना दिला होता. त्यावर सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी कारवाई करत बाणेरमध्ये दोन मोठ्या हॉटेलवर छापा टाकला. या हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी ११ मुलींची सुटका केली आहे. आठ दिवसांपूर्वीही पोलिसांनी अशीच कारवाई केली होती.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune Crime News
Sharad Mohol Case: शरद मोहोळ हत्या प्रकरण: मुख्य आरोपी विठ्ठल शेलार व रामदास मारणे न्यायालयीन कोठडीत; मुख्य सुत्रधार अद्याप फरार

लिंग निदानप्रकरणी तीन एजंटना अटक

कोल्हापुरातील वाशी नाका परिसरात बेकायदेशीर लिंग निदान छाप्यात आणखी तीन एजंटना पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली आहे. प्रदीप बाजीराव कोळी, पंकज नारायण बारटक्के आणि निखिल रघुनाथ पाटील अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.  या तिन्ही एजंटने गर्भलिंग निदानासाठी प्रत्येकी दोन ते तीन ग्राहक शोधून बनावट डॉक्टर सुनील पाटील यांच्यापर्यंत पोहोचवल्याचं तपासात स्पष्ट झालेले आहे. आरोग्य विभाग आणि करवीर पोलिसांनी 16 जानेवारीला सायंकाळी काेल्हापूरच्या नवीन वाशी नाका इथल्या सुलोचना पार्क इथं म्हाडा कॉलनीत छापा टाकून सोनोग्राफी मशीनसह अन्य साहित्य जप्त केले आहे.

Pune Crime News
Bengaluru Crime News:आंतरजातीय प्रेमसंबंधांना विरोध, भावानेचे केली बहिणीची हत्या; लेकीला वाचवताना आईचाही मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com