Uttar Pradesh Crime  Saam Tv
क्राईम

Shocking: बायकोसोबत अनैतिक संबंधाचा संशय; तरुणाने बहिणीच्या नवऱ्याला दिली भयंकर शिक्षा, खांबाला बांधलं अन्...

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये हत्याकांडाची घटना घडली. तरुणाने बहिणीच्या नवऱ्याला मारहाण करत त्याचा जीव घेतला. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

Priya More

Summary:

उत्तर प्रदेशमध्ये तरुणाने बहिणीच्या नवऱ्याची हत्या केली

बायकोसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून उचललं टोकाचं पाऊल

घराच्या अंगणात खांबाला बांधून बेदम मारहाण केली

३ तास केलेल्या मारहाणीत बहिणीच्या नवऱ्याचा जागीच मृत्यू

उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये हत्याकांडाची भयंकर घटना समोर आली आहे. याठिकाणी एका तरुणाने आपल्या भावोजीची निर्घृण हत्या केली. या तरुणाने खांबाला दोरीच्या सहाय्याने भावोजीला बांधून बेदम मारहाण केली. या मारहाणीत भावोजीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बहिणीच्या नवऱ्याचे आपल्या बायकोसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपी तरुणाला होता. याच रागातून आरोपी तरुणाने आपल्या कुटुंबीयांसोबत भावोजीची निर्घृण हत्या केली.

नरेंद्र उर्फ लाला असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर आरोपी गंगाराम, त्याची बायको भुनेश्वरी, मुलगा कमलेश आणि सून या चौघांनी नरेंद्रला घराच्या अंगणात असलेल्या एका खांबाला बांधले आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा नरेंद्रचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली.

मृत्यू झालेल्या नरेंद्रचे मेहुणा गंगारामची बायको भुनेश्वरसोबत गेल्या २ वर्षांपासून अनैतिक संबंध होते. काही दिवसांपासून भुनेश्वरीने नरेंद्रसोबत बोलणं बंद केले होते आणि ती दुसऱ्या व्यक्तीसोबत बोलत होती. यामुळे नाराज झालेल्या नरेंद्रने दारूच्या नशेत गंगारामचे घर गाठले आणि भुनेश्वरीला शिवीगाळ केला. तेव्हा गंगारामला बायकोच्या अनैतिक संबंधाविषयी कळाले. त्यानंतर संतप्त झालेल्या गंगारामने नरेंद्रला खांबाला बांधून अमानुषपणे मारहाण केली आणि त्याचा जीव घेतला.

नरेंद्रची बायको नन्ना देवीने पोलिस ठाण्यात धाव घेत या प्रकरणी भाऊ गंगाराम, त्याची बायको भुनेश्वरी, मुलगा कमलेश आणि सून या चौघांविरोधात हत्येचा आरोप केला. तिने आरोप केला की, दुपारी १२ वाजल्यापासून ते ३ वाजेपर्यंत चौघांनी नरेंद्रला मारहाण केली. या मारहाणीमध्ये नरेंद्रचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. पोलिस सध्या तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zila Parishad-Corporation Election: जिल्हा परिषदेसह महापालिकेच्या निवडणुका कधी होणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितली तारीख

Maharashtra Live News Update: हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील बर्गेवाडी मध्ये भीषण आग

अंडे खाणार, कॅन्सर होणार? अंड्यांमध्ये बंदी असलेलं घातक रसायन?

Stale Chapati: रात्रीच्या शिळ्या चपात्यांना नवा ट्विस्ट; सकाळी मस्त बनवा मस्त टेस्टी नाश्ता

Peru Benefits: हिवाळ्यात भाजलेला पेरू खाल्ल्याने होतील 'हे' हेल्दी फायदे

SCROLL FOR NEXT