Crime News  x
क्राईम

Crime : पतीला अडकवण्यासाठी कट आखला; पोटच्या मुलीची हत्या केली, कुजलेल्या मृतदेहासमोर महिलेनं बॉयफ्रेंडसोबत झोडली पार्टी

Crime News : पतीला फसवण्याच्या उद्देशाने एका महिलेने तिच्याच सहा वर्षीय मुलीची हत्या केली. मुलीचा मृतदेह ३६ तास कुजत होता. महिलेने मुलीच्या कुजलेल्या मृतदेहासमोर प्रियकरासोबत पार्टी केली.

Yash Shirke

Crime : पतीला फसवण्यासाठी एका महिलेने तिच्या सहा वर्षांच्या चिमुकलीची गळा दाबून हत्या केली. या हत्येमध्ये महिलेच्या प्रियकराने महिलेची साथ दिली. मुलीची हत्या केल्यानंतर आरोपी महिला आणि तिच्या प्रियकरांनी मुलीच्या मृतदेहासमोर पार्टी केली. चौकशीदरम्यान प्रियकरांनी हत्येची कबुली दिली आणि महिलेची पोलखोल झाली. ही घटना लखनऊमध्ये घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोशनी खान या महिलेने १४ जुलै रोजी पहाटे ३ च्या सुमारास पोलिसांनी फोन केला. माझ्या पतीने, शाहरुखने माझ्या सहा वर्षांच्या मुलीची हत्या केल्याचा आरोप रोशनीने केला. त्यानंतर पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली. रोशनीच्या तक्रारीवरुन शाहरुखविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मृतदेहाची स्थिती पाहून पोलिसांना संशय आला. मृतदेह ज्या खोलीत होता, तेथे तीव्र दुर्गंध येत होता; तसेच मृतदेहात कीटकांचा प्रादुर्भाव झाला होता. हत्येला बराच कालावधी उलटल्याचे स्पष्ट झाले. शवविच्छेदन अहवालात मुलीची हत्या ३६ तासांपूर्वी झाल्याचे म्हटले होते. रोशनी आणि तिची मुलगी तिच्या प्रियकरासोबत उदीतसोबत राहत होती. शाहरुख मुलीला भेटण्यासाठी आला होता. आमच्यात जोरदार वाद झाला आणि त्याने मुलीची हत्या केल्याचा आरोप रोशनीने केला होता. पण शवविच्छेदन अहवालामुळे रोशनीच्या जबाबात विसंगती आढळली.

त्यानंतर पोलिसांनी रोशनी आणि उदीत यांनी पोलीस ठाण्यात आणले. रोशनी पोलिसांना दिशाभूल करत असताना चौकशीदरम्यान उदित रडू लागले. रोशनीनेच तिच्या मुलीची हत्या केल्याचे उदितने कबुल केले. आम्ही हत्येनंतर पार्टी केल्याचे उदितने पोलिसांना सांगितले. नवऱ्याला फसवण्यासाठी मुलीची हत्या केल्याचे रोशनीने कबुल केले. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेत कारवाईला सुरुवात केली. रोशनीने यापूर्वीही तिच्या सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले होते. सासरच्या मंडळींना तुरुंगात पाठवण्यासाठी त्यांच्यावर आरोप केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Update : राज्यात पावसाचा ब्रेक! पुढील 5 दिवस पावसाचा जोर कमी, हवामान विभागाचा अंदाज | VIDEO

Viral News : एकमेकींचे केस धरले, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; २ महिला वकिलांचा भररस्त्यात राडा; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: वाटद एमआयडीसी विरोधात आज होणार शेतकऱ्यांची जनआक्रोश सभा

अरे बापरे! रात्रीच्या अंधारात रस्त्यावर ८ फूट लांबीची मगर; पाहताक्षणी नागरिकांचा अडकला श्वास

Tesla Cars: ५०० किमी पेक्षा अधिक रेंज देणाऱ्या टेस्लाच्या सर्वोत्तम ५ मॉडेल्स

SCROLL FOR NEXT