Tamilnadu Crime Saam Tv
क्राईम

Crime: अनैतिक संबंधाचा भयंकर शेवट! बायकोला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं, संतापलेल्या नवऱ्याने दोघांचं शीर धडावेगळं केलं

Tamilnadu Crime: तामिळनाडूमध्ये एका व्यक्तीने आपल्या बायकोला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले. त्यानंतर संतप्त झालेल्या या व्यक्तीने बायकोसह तिच्या प्रियकराची निर्घृण हत्या केली. दोघांचे शीर धडावेगळं केलं.

Priya More

तामिळनाडूमध्ये दुहेरी हत्याकांडाची भयंकर घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने बायको आणि तिच्या प्रियकराची निर्घृण हत्या केली. बायकोच्या विवाहबाह्य संबंधाबद्दल कळताच संतापलेल्या नवऱ्याने महिलेला आणि तिच्या प्रियकराला अशी शिक्षा दिली की त्याचा कुणीच विचार केला नसेल. या व्यक्तीने बायको आणि तिच्या प्रियकराचे शीर धडावेगळं केलं. या घटनेमुळे तामिळनाडूनध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ४८ वर्षीय लाकूडतोड मजूर कोलांजीला त्याच्या बायकोचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता. त्याची ३७ वर्षीय बायको लक्ष्मीचे एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. मंगळवारी रात्री बायकोला मी शहराबाहेर जात असल्याचे सांगून कोलांजी घराबाहेर पडला. त्याने बायकोला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला होता. नवरा बाहेर गेल्यामुळे लक्ष्मीचा प्रियकर तिच्या घरी आला होता. त्यानंतर मध्यरात्री अचानक कोलांजी घरी परत आला. त्याने लक्ष्मीला तिच्या प्रियकरासोबत घराच्या टेरेसवर रंगेहाथ पकडले. त्यानंतर जे घडलं ते खूप भयंकर होते.

बायकोला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडल्यामुळे संतप्त झालेल्या कोलांजीने दोघांची निर्घृण हत्या केली. त्याने धारधार शस्त्राने वार करत बायको आणि तिच्या प्रियकराचे शीर धडावेगळं केलं. त्यानंतर त्याने दोघांचे शीर आपल्या दुचाकीला बांधले आणि वेल्लोर मध्यवर्ती कारागृहाच्या गेटवर जाऊन पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. आपण केलेल्या गुन्ह्याचा पुरावा पोलिसांना देण्यासाठी त्याने दोघांचे शीर आपल्यासोबत नेले होते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

या घटनेची माहिती मिळताच वंजाराम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना घटनास्थळावर लक्ष्मी आणि थंगारासू यांचे शीर नसलेले मृतदेह आढळून आले. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. आरोपीला तीन लहान मुली आहेत. वडिलांनी केलेल्या कृत्यामुळे या मुलांना मोठा धक्का बसला. आई जगात राहिली नाही आणि वडील पोलिस कोठडीत असल्यामुळे मुलांनी टाहो फोडला. या दुहेरी हत्याकांडमुळे तामिळनाडू हादरले आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : दुकानदार करायचा अश्लील मेसेज; संतापलेल्या तरुणीने दुकानात येऊन चोपला, कल्याणमधील घटना

Bharat Gogawale: मंत्री भरत गोगावले रोहा पालिका मुख्यधिकाऱ्यांवर हक्कभंग आणणार, काय आहे संपूर्ण प्रकरण? VIDEO

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात जोरदार पाऊस

Jio Prepaid Plans: जिओची धमाकेदार ऑफर! अतिरिक्त डेटा अन् एंटरटेनमेंटची मेजवानी

शिवेंद्रराजे यांनी सातारा गॅझेटवर केला खुलासा; म्हणाले... VIDEO

SCROLL FOR NEXT