Maharashtra Politics: पालघरमध्ये ठाकरे गटासह बविआला खिंडार; अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

Former Corporators From Vasai Virar Enter BJP: पालघर जिल्ह्यातील वसई- विरार परिसरातील बहुजन विकास आघाडी आणि उबाठा गटातील अनेक माजी नगरसेविका, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
BJP state president Ravindra Chavan and MLA Sneha Dubey welcome former BVA corporators and workers from Vasai-Virar into the party at the Mumbai BJP office.
BJP state president Ravindra Chavan and MLA Sneha Dubey welcome former BVA corporators and workers from Vasai-Virar into the party at the Mumbai BJP office.Saam Tv
Published On

निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करताच अनेक आजी, माजी आणि भावी नगरसेवक हे आपल्या मूळ पक्षाला रामराम ठोकत सत्तेत असणाऱ्या पक्षांमध्ये जाणे पसंत करत आहे. अशातच आज वसई, विरार येथील बविआ, उबाठाच्या माजी नगरसेविका, अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

BJP state president Ravindra Chavan and MLA Sneha Dubey welcome former BVA corporators and workers from Vasai-Virar into the party at the Mumbai BJP office.
पुण्यानंतर मुंबईत जमीन घोटाळा? 200 कोटींची जमीन फक्त 3 कोटींमध्ये खरेदी, मंत्र्यांवरील आरोपांनी खळबळ

वसई, विरार येथील बहुजन विकास आघाडीच्या माजी नगरसेविका शकुंतला शेळके आणि युवा अध्यक्ष गणेश धुमाळ, उबाठा गटाच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शनिवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला आ. स्नेहा पंडीत दुबे, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, मंडल अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, राजू म्हात्रे, नंदकुमार महाजन, विजेंद्र कुमार, प्रदेश कार्यालय सहसचिव भरत राऊत आदी उपस्थित होते.

BJP state president Ravindra Chavan and MLA Sneha Dubey welcome former BVA corporators and workers from Vasai-Virar into the party at the Mumbai BJP office.
भाजपात जोरदार इनकमिंग; बड्या नेत्याची पक्षात एन्ट्री, ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनीही सोडली साथ

यावेळी आ. स्नेहा दुबे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या कार्यपद्धती आणि नेतृत्वाने प्रेरित होऊन बविआ आणि उबाठा गटातून अनेकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. वसई, बोईसर व नालासोपारा येथील विविध पक्षातील अनेक जण भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सूक असून अजूनही काही प्रवेश लवकरच होणार आहेत. आज प्रवेश केलेल्या सर्वांच्या साथीने भाजपाचे संघटन मजबूत करण्यासाठी जिवाचे रान करू. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये मेहनत घेऊन महापालिकेवर भाजपाचा झेंडा नक्की फडकवू अशी ग्वाहीही आ. स्नेहा पंडित दुबे यांनी दिली.

BJP state president Ravindra Chavan and MLA Sneha Dubey welcome former BVA corporators and workers from Vasai-Virar into the party at the Mumbai BJP office.
Maharashtra Politics: 'उद्या आम्ही कुठे असू सांगता येत नाही...', माणिकराव कोकाटेंचे खळबळजनक विधान

बविआ आणि उबाठा गटातून भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये वसई येथील साई संस्थान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष नागेश शेळके, जयेश धुमाळ, अंकुश शेळके, अनिल सिंग, वासंती धुमाळ, शिल्पा धनगर, समाजसेवक रोहित पाटील, भारतीय लहुजी सेनेचे पालघर जिल्हा प्रमुख वेरशी भानुशाली, उबाठा गटाचे भोईदापाडा शाखाप्रमुख शशिकांत अवघडे, आकाश मालेकर आदींचा समावेश आहे. या पक्षप्रवेशामुळे पालघर जिल्ह्यामध्ये भाजपची ताकदवाढणार असल्याचे राजकीय जाणकारांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com