भाजपात जोरदार इनकमिंग; बड्या नेत्याची पक्षात एन्ट्री, ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनीही सोडली साथ

BJP Grows Stronger in Vasai-Virar: आज भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवकांसोबत काही महत्वाचे पदाधिकारी करणार भाजपात प्रवेश.
BJP Grows Stronger in Vasai-Virar
BJP Grows Stronger in Vasai-VirarSaam
Published On
Summary
  • भाजपमध्ये पक्ष प्रवेशाचा धडाका सुरु

  • वसई- विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला खिंडार

  • बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक शकुंतला शेळके भाजपच्या गळाला

  • आमदार स्नेहा दुबे यांचा बहुजन विकास आघाडीला धक्का

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं. नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या. येत्या २ डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसई विरारमधील राजकीय वारे वेगाने वाहू लागले आहेत. अशातच भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला खिंडार पडलं आहे. बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक शकुंतला शेळके यांनी पक्षाची साथ सोडली आहे. शेळके यांनी भाजप पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

BJP Grows Stronger in Vasai-Virar
'फक्त सांगा कोणती मुलगी पाठवू'; भाजप महिला नेत्याचा सेxx स्कँडलचा पर्दाफाश, नेत्यांना पुरवते परदेशी तरूणी

भाजप आमदार स्नेहा दुबे यांनी बहुजन विकास आघाडीला धक्का दिला आहे. स्नेहा दुबे यांच्या माध्यमातून शेळके यांनी भाजपची साथ दिली आहे. शकुंतला शेळके यांच्यासोबत अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपची साथ दिली. तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजप पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

BJP Grows Stronger in Vasai-Virar
लग्नानंतर स्तनांचा आकार खरोखर वाढतो? नेमकं कारण काय? तज्ज्ञांनी दिली खरी माहिती

या पक्षप्रवेशामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षात जोरदार इनकमिंग सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून शकुंतला शेळके या बहुजन विकास आघाडीला जय महाराष्ट्र करणार असल्याची चर्चा होती. या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. त्यांनी भाजपचं कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. आज भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com