Sakshi Sunil Jadhav
आजकाल प्रत्येक महिला आपल्या सौंदर्यासाठी मेकअपचा वापर करते. पण हा मेकअप योग्य पद्धतीने न केल्यास किंवा जुनी प्रॉडक्ट्स वापरल्यास त्वचेवर गंभीर परिणाम होऊ शकतात.
फाउंडेशन, कंसीलर किंवा लिपस्टिक बरेच दिवस वापरल्याने त्यामध्ये बॅक्टेरिया वाढतात. त्यामुळे expired प्रॉडक्ट्स वापरू नका.
अनेकजणी ब्रश महिनाभर न धुता वापरतात. त्यामुळे त्यात तेलकटपणा आणि धूळ साचते. हेच इन्फेक्शनचं प्रमुख कारण ठरतं.
फ्रेंडचे लिपस्टिक किंवा आयलाइनर वापरणं धोकादायक ठरू शकतं. त्वचेवरील बॅक्टेरिया दुसऱ्यांकडे पसरू शकतात.
उन्हाळा आणि पावसाळ्यात मेकअपमध्ये ओलावा साठतो. ज्यामुळे बॅक्टेरिया वाढतात. कोरड्या आणि थंड जागी प्रॉडक्ट्स ठेवा.
पिंपल्सवर थेट फाउंडेशन किंवा कंसीलर लावल्यास बॅक्टेरिया त्वचेत खोलवर जातात आणि संसर्ग वाढतो.
रात्री मेकअप लावून झोपल्यास त्वचा श्वास घेऊ शकत नाही आणि रोमछिद्रं बंद होतात. त्याने बॅक्टेरियल इन्फेक्शन आणि अॅक्ने वाढतात.
इन्फेक्शन वाढल्यास त्वचेवर खाज येते किंवा लालसरपणा दिसतो. त्यामुळे त्वरित त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.