kolsewadi police arrested bike thief near kalyan  Saam Digital
क्राईम

Kalyan Crime News : तब्बल 150 सीसीटीव्हीची तपासणी, 46 क्रमांक पाहताच पाेलिसांनी महागड्या बाईक चाेरणा-याला केलं जेरबंद

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कदम म्हणाले तेजस हा सराईत बाईक चोरटा आहे. तो एका गॅरेजमध्ये मेकॅनिक म्हणून काम करत असलेल्या त्याला बाईक बद्दल सर्व माहिती होती. या कलेचा वापर करून तो बाईक चोरी करत होता.

Siddharth Latkar

- अभिजित देशमुख

Kalyan :

चोरीच्या गुन्ह्यात तब्बल 150 हुन अधिक ठिकाणचे सीसीटीव्ही तपासात कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी एका सराईत बाईक चोरट्याला बेड्या ठोकल्या. तेजस उर्फ आकाश मेंगानी असे या सराईत चोरट्याचे नाव असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. तेजसच्या बाईकवर लिहिलेल्या 46 या क्रमांकामुळे ताे पोलिसांच्या तावडीत सापडला. त्याच्याकडून पोलिसांनी 3 महागड्या बाईक हस्तगत केल्या आहेत. (Maharashtra News)

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरातील महागडी बाईक चोरीस गेली. त्यानंतर काही तासातच एक दुसरी बाईक देखील चोरीला गेल्याची घटना समोर आली. याप्रकरणी कोळशेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या चोरट्याचा शोध घेण्यासाठी कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ, कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ट पोलिस निरिक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी दिनकर पगारे, पोलिस कर्मचारी सुशील हंडे तसेच अन्य पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला.

बाईक चोरट्याला शोधण्याकरीता कल्याण पूर्व आणि पश्चिमेतील जवळपास १५० सीसीटीव्ही तपासण्यात आले. एका सीसीटीव्हीत स्पोर्ट बाईक चालविताना एक तरुण दिसला. त्याने मास्क घातला असल्याने त्याची ओळख पटत नव्हती. बाईकवर ४६ नंबर लिहिलेला होता.

पोलिसांनी काळा तलाव परिसरात तपासणी सुरु केली. त्याठिकाणी ती स्पोर्ट बाईक आढळून आली. पोलिसांनी ही बाईक कोणाची आहे याची विचारपूस सुरू केली असता समोर बसलेल्या तरुणाने ती बाईक माझी असल्याचे सांगितले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांनी या तरुणाची चौकशी केली असता सुरुवातीला तरुणाने नाव व पत्ता खोटा सांगितलं मात्र पोलिसांना संशय आल्याने त्याला ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली. तेजस उर्फ आकाश मेघानी असे खरे नाव असल्याचे तपासात समोर आले.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कदम म्हणाले तेजस हा सराईत बाईक चोरटा आहे. तो एका गॅरेजमध्ये मेकॅनिक म्हणून काम करत असलेल्या त्याला बाईक बद्दल सर्व माहिती होती. या कलेचा वापर करून तो बाईक चोरी करत होता. त्याच्या विरोधात विविध पोलिस ठाण्यात ९ गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून पोलिसांनी ३ महागड्या बाईक हस्तगत करण्यात आल्या आहेत.

तेजस काही साथीदारांच्या मदतीने बाईक चोरी करायचा आणि चोरी केलेली बाईक साेन साखळली चाेरी करणाऱ्या इराणी चोरट्यांना पुरवित होता. पोलिस त्याच्या साथीदारांचाही शोध घेत आहेत. यामुळे साेन साखळी चाेरांची नावे समाेर आले असून लवकरच त्यांना गजाआड केले जाईल अशी शक्यता आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Ticket: रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! यापुढे कन्फर्म तिकिटाची तारीख बदलू शकता, कधीपासून लागू होणार नवा नियम?

Mumbai To Goa: मुंबईवरुन गोव्याला जायचे आहे? मग जाणून घ्या प्रवास करताना कोणता मार्ग सर्वोत्तम

Air India: एअर इंडियाच्या फ्लाइट तिकीटावर ६००० रुपयांचा डिस्काउंट; कोणाला मिळणार फायदा?

Maharashtra Live News Update : विमानाचं तिकीट स्वस्त मिळावं यासाठी उड्डाण योजना- पीएम मोदी

PM Narendra Modi : मुंबईला मिळालं आणखी एक आंतरराष्ट्रीय विमानतळ; दि. बा. पाटील यांचं स्मरण करत PM मोदी काय म्हणाले? VIDEO

SCROLL FOR NEXT