Student End Life Yandex
क्राईम

10th Board Exam: पेपर अवघड गेल्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, गडहिंग्लजमधील धक्कादायक घटना

Student End Life: दहावीचे पेपर अवघड गेल्यामुळे १६ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. गडहिंग्लजमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.

Rohini Gudaghe

Kolhapur News Student End Life

राज्यात दहावीची बोर्डाची परीक्षा सुरू (Kolhapur News) आहे. अनेक विद्यार्थी पेपर सोपे गेल्यामुळे खुश आहेत, तर अनेक विद्यार्थी थोडेसे तणावात देखील आहेत. याच तणावातून अनेकदा विद्यार्थी नैराश्यात जातात. बऱ्याचदा ते टोकाचं पाऊल उचलतात, अशीच एक घटना कोल्हापूरच्या गडहिंग्लजमधून समोर आली आहे. (Latest Crime News)

दहावीचे आतापर्यंत झालेले पेपर अवघड गेल्यामुळे १६ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. गडहिंग्लजमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. सत्यम लक्ष्मण कोळी (10th Class Paper) (वय १६, रा. स्वामी कॉलनी, गडहिंग्लज, मूळ गाव हेब्बाळ), असं आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव आहे. या विद्यार्थ्याने घरामध्ये फॅनला गळफास घेऊन जीवन संपवल्याचं समोर आली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सत्यमचे वडील खासगी नोकरी करतात. लक्ष्मण कोळी यांचा सत्यम हा गडहिंग्लजमध्ये एका खासगी शाळेत इयत्ता दहावीमध्ये शिकत होता. मार्च महिन्यात दहावीची परीक्षा सुरू आहे. परीक्षा सुरू झाल्यानंतर त्याला पेपर अवघड जात (Student End Life) होते. असं तो त्याच्या घरच्यांना सांगतही होता. याच तणावातून त्याने सोमवारी (१८ मार्च) सकाळी ९ च्या सुमारास त्याच्या बेडरूममध्ये फॅनला गळफास घेतला.

सत्यमने आत्महत्या केल्याचं निदर्शनास येताच घरच्यांनी तातडीने त्याला दवाखान्यात दाखल केलं. परंतु दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच सत्यमचा मृत्यू झाला होता. गडहिंग्लजमध्ये ही धक्कादायक घटना घडली (10th Student End Life) आहे. दहावीचे पेपर अवघड गेल्यामुळे सत्यमने जीवन संपवले आहे. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

आपल्याला पेपर अवघड जात असल्याचं सत्यमने आईवडिलांना बोलून दाखवलं होतं. सत्यमची आई रविवारी बाहेरगावी गेली होती. त्याचा मोठा भाऊ शिक्षणासाठी कोल्हापूरला (10th Board Exam) होता. सोमवारी सत्यमच्या घरी कोणीही नव्हतं. तेव्हाच त्याने आत्महत्या केली आहे. दहावीचे पेपर सुरू झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी जीवन संपवल्याच्या घटना समोर आल्या आहेत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT