Chhatrapati Sambhajinagar Crime: शेतीच्या वादातून दगडाने ठेचून केली सख्ख्या भावाची हत्या, भाऊ आणि पुतण्याला अटक

Brother Killed Brother In Sillod: शेतीच्या वादातून सख्ख्या भावाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना सिल्लोड तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे.
Chhatrapati Sambhajinagar Crime
Chhatrapati Sambhajinagar CrimeSaam Tv
Published On

रामनाथ ढाकणे

Killed Brother Due Farm Dispute

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यामध्ये शेतीच्या वादातून सख्ख्या भावाची हत्या केल्याची घटना घडली आहे. शेती आणि सामाईक घर तसंच जुन्या वादातून भाऊ आणि पुतण्याने विटा, दगडाने मारहाण केली. या घटनेत सख्ख्या भावाचा मृत्यू झालाय. ही घटना सिल्लोड (Sillod) तालुक्यातील भराडी जवळील पिरोळा येथे घडली आहे.  (Latest Marathi News)

याप्रकरणी मृत व्यक्तीच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून दोघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली (Brother Killed Brother In Sillod) आहे. जम्मन त्रिंबक गोरे, असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर भाऊ रघुनाथ त्रंबक गोरे आणि पुतण्या कृष्णा रघुनाथ गोरे, अशी आरोपींची नावे आहेत. गेल्या काही दिवसापासून मृत व आरोपी यांच्यामध्ये सामाईक शेतीवरून भांडणे सुरू होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेतीच्या वादातून केली भावाची हत्या

ही घटना शनिवारी रात्री (१६ मार्च) रोजी घडली आहे. जुन्या शेतीच्या व घराच्या वादातून सख्ख्या भावाचा खून झाला आहे. मृत्त व आरोपी सख्खे भाऊ आहेत. त्यांची वडिलोपार्जित समाईक शेती आणि घर ( Brother In Sillod) आहे. या संपत्तीवरून त्यांच्यात अनेक दिवसांपासून भांडण सुरू होते. दोन्ही भावांची पिरोळा शिवारात गट नं. ८२ मध्ये शेती आहे. जम्मन गोरे भराडी येथे राहत होते, तर आरोपी पिरोळा शिवारातील शेतात राहतात.

मृतक अम्मन गोरे यांचे वखारीचे काम सुरू होते. त्यामुळे शनिवारी रात्री ते शेतात झोपण्यासाठी गेले. झोपल्यावर संधी साधत आरोपींनी त्यांच्या डोक्यावर आणि तोंडावर दगड, विटांनी मारहाण (Killed Brother Due Farm Dispute) केली. या मारहाणीत मृतक गंभीर जखमी झाले. नंतर आरोपी त्यांना पाण्याच्या डबक्यात टाकून निघून गेले. या घटनेची माहिती जम्मन यांच्या मुलाला रात्रीच मिळाली.

Chhatrapati Sambhajinagar Crime
Wife killed Husband : बॉयफ्रेंडच्या मदतीनं पत्नीनं केली पतीची हत्या; १ कोटी रुपयांच्या टर्म इन्शुरन्सवरही होता डोळा

मृतदेह डबक्यात फेकला

त्याने शेतात जाऊन पाहिलं असता वडील पाण्याच्या डबक्यात मृत अवस्थेत दिसून (Chhatrapati Sambhajinagar Crime) आले. त्याने तातडीने ही माहिती पोलिसांनी दिली. माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तपासाची चक्रे फिरवत काही तासात आरोपींना अटक केली.

सागर जम्मन गोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात (crime news) आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक सचिन क्षीरसागर करत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये दीड महिन्यात खुनाची ही तिसरी घटना आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime
Nephew Killed Aunt : शरीर सुखाच्या मागणीला नकार दिला; एकतर्फी प्रेमातून भाच्याने मामीला संपवलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com