Kolhapur Crime  Saam Tv
क्राईम

Kolhapur Crime : लिव्ह-इन-रिलेशनशिपमधून गर्लफ्रेंडची हत्या, नंतर गावी जाऊन तरुणानं स्वतःलाही संपवलं

Kolhapur Police: कोल्हापूरमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडची निर्घृण हत्या केली. गर्लफ्रेंडच्या हत्येनंतर आरोपीने गावी जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे कोल्हापूरात खळबळ उडाली आहे.

Priya More

रणजित माजगावकर, कोल्हापूर

कोल्हापूरमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडची हत्या केली. गर्लफ्रेंडच्या हत्येनंतर तरुणाने देखील आत्महत्या करत आयुष्य संपवल्याची घटना समोर आली. गळफास घेतलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली. गर्लफ्रेंडने लग्नाला नकार दिल्यामुळे तरुणाने तिची चाकूने भोसकून हत्या केली होती. या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. आता या आरोपीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लिव्ह इन रिलेशनशिप प्रकरणातून गर्लफ्रेंडची हत्या केलेल्या तरुणाने स्वतःला संपवलं. गळफास घेतलेल्या अवस्थेत या तरुणाचा मृतदेह त्याच्या गावी आढळून आला. मंगळवारी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असलेल्या या तरुण आणि त्याच्या गर्लफ्रेंडमध्ये लग्नावरून वाद झाला होता. या वादानंतर संतप्त झालेल्या तरुणाने समीक्षा उर्फ सानिका नरसिंगेची चाकूने वार करत हत्या केली होती.

सतीश यादव असं या आरोपीचे नाव होते. गर्लफ्रेंडची हत्या केल्यानंतर आरोपी सतीश फरार झाला होता. गांधीनगर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिस सतीशचा शोध घेत होतेच तेवढ्यात सतीशचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतेदह आढळून आला. आरोपी सतीश यादवने शाहूवाडी तालुक्यातील माळापुडे कातळापुडी या गावी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी सतिशचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.

दरम्यान, सानिका नरसिंगे या तरुणीचा २०१९ मध्ये लक्ष तीर्थ वसाहतीतील एका तरुणाशी लग्न झाले होते. पण सहा महिन्यांतच तिचा संसार मोडला. नवऱ्यासोबत सतत होणाऱ्या मतभेदांमुळे सानिकाने घटस्फोटाचा निर्णय घेतला होता आणि हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित होते. याच काळात सानिकाने तिची मैत्रीण आयुष्यासोबत इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय सुरू केला होता. यातूनच सानिकाची ओळख सतीश यादव या तरुणाशी झाली.

सतीश, सानिका आणि आयु्षअया हे तिघेही गेल्या चार महिन्यांपासून सरनोबत वाडीत एका फ्लॅटमध्ये राहत होते. सतीश सानिकावर लग्नासाठी दबाव टाकत होता परंतु तिला लग्न करायचे नव्हते. ज्यामुळे दोघांमध्ये सतत वाद होत होते. लग्नाचा हंगाम संपल्याने फ्लॅटचे भाडे परवडत नसल्याने त्यांनी फ्लॅट सोडण्याचा निर्णय घेतला होता पण त्यांचे साहित्य तिथेच होते. घरमालकाच्या सांगण्यावरून सानिका आणि आयुष्या हे साहित्य आणण्यासाठी गेल्या होत्या तेवढ्यात सतीश तिथे आला आणि त्याने सानिकाच्या छातीवर चाकूने वार करत तिची हत्या केली आणि तिथून फरार झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT