Sangli Crime : भल्या पहाटे सांगलीत थरारक घटना; भाजी विक्रेत्या तरुणाची भररस्त्यात हत्या

Sangli News : सांगली शहरातील शंभर फुटी रोडवर पहाटेच्या सुमारास भाज्यांचा लिलाव पार पडतो. याठिकाणी बाजारात किरकोळ भाजीपाला विक्री करणारे व्यापारी भाजीपाला घेण्यासाठी येत असतात
Sangli Crime
Sangli CrimeSaam tv
Published On

सांगली : अगदी क्षुल्लक कारणांवरून हाणामारी, खुनाच्या घटना राज्यात ठिकठिकाणी रोज घडत असल्याचे समोर येत आहे. यातच सांगली शहरामध्ये एका भाजी विक्रेत्या तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भल्या पहाटे भररस्त्यावर घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

सांगली शहरातल्या शंभरफुटी रोडवर पाठलाग करत धारदार शस्त्राने महेश कांबळे या तरुणाचा खून करण्यात आला आहे. सांगली शहरातील शंभर फुटी रोडवर पहाटेच्या सुमारास भाज्यांचा लिलाव पार पडतो. याठिकाणी बाजारात किरकोळ भाजीपाला विक्री करणारे व्यापारी भाजीपाला घेण्यासाठी येत असतात. त्या निमित्ताने महेश कांबळे हा देखील येथे आला होता. 

Sangli Crime
Accident : सोलापूर पुणे महामार्गावर ट्रॅव्हल पलटली, पुण्यातील ३० जण जखमी, २० जणांची प्रकृती गंभीर

पाठलाग करत केली हत्या 

दरम्यान भाजी लिलाव प्रक्रियेत महेश भाजीपाला घेण्यासाठी आला असताना दोघा अज्ञातांनी महेशवर अचानक हल्ला केला. जीव वाचविण्यासाठी महेश गर्दीतून धावत सुटला असताना दोघांनी त्याचा पाठलाग करत कोयता व दगडांनी वार करत महेश कांबळे याच्यावर हल्ला करत हा खून केला आहे. महेश कांबळे हा भाजी विक्रीचा व्यवसाय करत होता. 

Sangli Crime
IPL Online Betting : आयपीएलच्या फायनल मॅचवर ऑनलाईन सट्टा; अमरावतीत पोलिसांनी कारवाई, सहाजण ताब्यात

खुनाचे कारण अस्पष्ट 

दरम्यान घटनेतील मृत महेश हा एका खुनातील आरोपी देखील होता. मात्र त्याची हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली. हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. दरम्यान घटना घडल्यानंतर पोलिसांनी याबाबत माहिती देण्यात आलाय. यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा यांच्यासह शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून अधिक तपास शहर पोलीस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com