Shirur Crime: पुन्हा नादाला लागाल तर चेंदामेंदा करून...; शिरूरमध्ये महिलांना फरफटत नेत अमानुष मारहाण; धक्क्दायक VIDEO

Shirur Police: शिरूरमध्ये पुन्हा जमिनीच्या वादावरून तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. शिरूरच्या न्हावरा गावात शेतजमिनीवरून महिलांना अमानुष मारहाण करण्यात आली. या मारहाणीत महिला गंभीर जखमी झाल्या. याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Shirur Crime: पुन्हा नादाला लागाल तर चेंदामेंदा करून...; शिरूरमध्ये महिलांना फरफटत नेत अमानुष मारहाण; धक्क्दायक VIDEO
Shirur CrimeSaam Tv
Published On

रोहिदास गाडगे, शिरूर

शिरूरमध्ये जमिनीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतजमिनीच्या वादातून महिलांना फरफटत नेत अमानुष मारहाण करण्यात आली. ही घटना शिरुर तालुक्यातील न्हावरा गावात घडली. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरुर तालुक्यातील न्हावरा गावात महिलांना अमानुष मारहाण करण्यात आली. शेतजमिनीच्या वादातून ही मारहाण झाली. पुरुष आणि महिलांकडून न्हावरे गावातील देशमुख कुटुंबामधील महिलांना फरफटत नेत अमानुष मारहाण केली. ऊस टिपरे, लाकडी काठीच्या सहाय्याने महिलांना मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे शिरूरमध्ये खळबळ उडाली.

Shirur Crime: पुन्हा नादाला लागाल तर चेंदामेंदा करून...; शिरूरमध्ये महिलांना फरफटत नेत अमानुष मारहाण; धक्क्दायक VIDEO
Pune Crime : पुण्यात लेकीची छेड काढण्यावरुन कडाक्याचं भांडण, बापाच्या चेहऱ्यावर-डोक्यावर कोयत्यानं वार; घरचे पोहचतात तोवर...

आरोपींकडून शिवीगाळ आणि जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. या मारहाणीमध्ये प्रियंका देशमुख, रूपाली देशमुख, मंदा देशमुख या महिला या मारहाणीत गंभीर जखमी झाल्या आहे. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे गावात संतापाचे वातावरण आहे. आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

Shirur Crime: पुन्हा नादाला लागाल तर चेंदामेंदा करून...; शिरूरमध्ये महिलांना फरफटत नेत अमानुष मारहाण; धक्क्दायक VIDEO
Crime News : कर्ज देणाऱ्याचा सतत तगादा, कंटाळून टेरेसवर जाऊन तरुणानं आयुष्य संपवलं; चिठ्ठी लिहून एकनाथ शिंदेंना म्हणाला...

याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीनंतर त्रिंबक हिंगे, कमल हिंगे, साधना देशमुख, यशश्री हिंगे यांनी मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पुन्हा आमच्या नादाला लागतात तर चेंदामेंदा करुन टाकीण अशी देशमुख कुटुंबातील महिलांना धमकी देण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Shirur Crime: पुन्हा नादाला लागाल तर चेंदामेंदा करून...; शिरूरमध्ये महिलांना फरफटत नेत अमानुष मारहाण; धक्क्दायक VIDEO
Sangli Crime : भल्या पहाटे सांगलीत थरारक घटना; भाजी विक्रेत्या तरुणाची भररस्त्यात हत्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com