Pune Crime: पुणे हादरले! १५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर प्रकार उघड

Pune Police: पुण्यामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला. याप्रकरणी १९ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune Crime: पुणे हादरले! १५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर प्रकार उघड
Pune Crime Saam Tv
Published On

सचिन जाधव, पुणे

पुण्यामध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. या घटनेमुळे पुणे पुन्हा हादरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. ही १५ वर्षीय मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात १९ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा तरुण कोथरुडमधील सुतारदरामध्ये राहतो.

Pune Crime: पुणे हादरले! १५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर प्रकार उघड
Crime News : कर्ज देणाऱ्याचा सतत तगादा, कंटाळून टेरेसवर जाऊन तरुणानं आयुष्य संपवलं; चिठ्ठी लिहून एकनाथ शिंदेंना म्हणाला...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार १७ मे ते जुलै २०२४ या कालावधीत घडला. अल्पवयीन मुलगी घरी एकटी होती. त्यावेळी आरोपीने तिला गोड बोलून लग्न करण्याचे आमिष दाखवले. घरी एकटी असल्याचा गैरफायदा घेत आरोपीने तिच्याशी जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यात अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली.

Pune Crime: पुणे हादरले! १५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर प्रकार उघड
Beed Crime : तुमच्या मुलीचे माझ्याकडे अश्लील व्हिडिओ, पैसे दिले नाहीतर...; बीडमध्ये संस्थाचालकाला धमकी, आरोपी दुसरा कोणी नसून...

मुलगी गर्भवती राहिल्यानंतर बलात्काराची ही घटना उघड झाली. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक म्हणजे पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास नांदेड सिटी पोलिसांकडून सुरू आहे. मुलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Pune Crime: पुणे हादरले! १५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर प्रकार उघड
Nagpur Crime: २ लाखांसाठी सासरच्यांकडून जाच, नवविवाहितेने उचललं टोकाचं पाऊल; लग्नानंतर ३५ व्या दिवशी आत्महत्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com