Beed Crime : तुमच्या मुलीचे माझ्याकडे अश्लील व्हिडिओ, पैसे दिले नाहीतर...; बीडमध्ये संस्थाचालकाला धमकी, आरोपी दुसरा कोणी नसून...

Beed Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, बीडमध्ये दररोज वेगवेगळ्या घटना घडताना दिसत आहेत. यातच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
Institutional Manager Threatened by daughter Video Viral
Institutional Manager Threatened by daughter Video ViralSaam Tv News
Published On

योगेश काशिद, साम टिव्ही

बीड : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, बीडमध्ये दररोज वेगवेगळ्या घटना घडताना दिसत आहेत. यातच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चक्क संस्थाचालकालाच पाच लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. 'तुमच्या मुलीचे माझ्याकडे अश्लील व्हिडिओ आहेत, आणि ते मी व्हाट्सअप आणि सोशल माध्यमात व्हायरल करणार आहे', अशी धमकी देत पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. त्यापैकी १६ हजार रुपये दिले. मात्र उर्वरित पैशांसाठी पुन्हा धमकी देण्याचं सत्र सुरू झालं. या प्रकरणी श्याम वाघमारे आणि महेश वेताळ या दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून संस्थाचालकाच्या दोन शिक्षण संस्था आहेत. त्यांची पत्नी एका गावाची सरपंच आहे श्याम वाघमारे (रा, अथर्वण पिंपरी) हा व्यक्ती त्यांना मागील काही दिवसापासून सातत्याने त्रास देत होता. 'तुमच्या मुलीचे अश्लील व्हिडिओ माझ्याकडे असून ते व्हायरल करण्याची', धमकी त्याने अनेकवेळा दिली आहे. पाच लाख रुपयांची खंडणी मागितली त्यांनी एक व्हिडिओही संस्थाचालकाच्या मुलाच्या व्हाट्सअपवर पाठवला. या प्रकरणानंतर त्यांनी श्याम वाघमारे याला १६ हजार रुपयेही दिले. मात्र, उर्वरित पैशांसाठी त्याने पुन्हा धमकी देणं सुरू केलं. त्यानंतर संस्थाचालकाने पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Institutional Manager Threatened by daughter Video Viral
Kalyan News : दुर्गाडी किल्ल्याची भिंत कोसळली, शिंदे सेनेचा आमदार भडकला, ठेकेदाराला दिला इशारा

या प्रकरणाचा मास्टरमाइंड हा संस्थेतील कर्मचारी असून त्याचे नाव महेश वेताळ आहे. महेश वेताळ हा व्हिडिओ कॉलवर संस्थाचालकाच्या मुलीशी बोलत असताना त्याने संगमत करून हा व्हिडिओ इतर कुणाच्यातरी मदतीने रेकॉर्ड केला होता. तोच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत श्याम वाघमारे हा खंडणी मागत होता. त्यामुळे कर्मचारी वेताळवरही गुन्हा नोंद झाला आहे.

Institutional Manager Threatened by daughter Video Viral
Shocking : हृदयद्रावक! हवेत फेकलेलं बाळ जन्मदात्या बापाच्या हातातून निसटलं; डोक्यावर आपटून चिमुकल्याचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com