Shocking : हृदयद्रावक! हवेत फेकलेलं बाळ जन्मदात्या बापाच्या हातातून निसटलं; डोक्यावर आपटून चिमुकल्याचा मृत्यू

nashik Shocking News : नाशिकमध्ये हवेत फेकलेल्या बाळाचा डोक्यावर आपटून चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नाशिकच्या इंदिरानगरमध्ये ही घटना घडली आहे.
nashik Crime
nashik Saam tv
Published On

तबरेज शेख, साम टीव्ही

नाशिक : बापाचं त्याच्या मुलावर जीवापाड प्रेम असतं. बाळाचा बाप स्वत:च्या चिमुकल्या मुलाला आवडीने खेळवत असतो. काही जण बाळाला हवेत फेकून झेलत असतात. मात्र, असाच प्रकार करणे एका व्यक्तीला चांगलाच महागात पडला आहे. चिमुकल्या बाळाला हवेत फेकल्यानंतर बापाच्या हातातून झेल निसटला. त्यानंतर डोक्याला लागून चिमुकला गंभीर जखमी झाला. त्यानंतर रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

nashik Crime
Ladki Bahin Yojana : 50 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरणार? तुमचं नाव यादीत आहे का? वाचा सविस्तर, VIDEO

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या इंदिरानगर परिसरात हृदयद्रावक घटना घडली आहे. 11 महिन्याच्या चिमुकल्याला खेळवता खेळवता बापाच्या हातातून निसटल्याने डोक्याला मार लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण नाशिक शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

nashik Crime
Kalyan News : दुर्गाडी किल्ल्याची भिंत कोसळली, शिंदे सेनेचा आमदार भडकला, ठेकेदाराला दिला इशारा

वडील 21 मे रोजी रात्री कामावरून परतल्यानंतर चिमुकल्याला हातात घेतलं. त्यानंतर चिमुकल्याला वरच्या दिशेने झेल घेण्यासाठी फेकले. मात्र झेल घेता घेता जन्मदात्या पित्याच्या हातातून निसटला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय. ओम वासुदेव होले असं दुर्दैवी मृत्यू झालेल्या 11 महिन्याच्या बाळाचे नाव आहे.

nashik Crime
Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे प्रकरणाला नवं वळण; आत्महत्येचं रहस्य उलगडणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

चिमुकल्याला दुखापत झाल्यानंतर त्याला नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा त्याला मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र मेंदूला गंभीर इजा पोहोचली होती. या चिमुकल्याने मंगळवारी अखेरचा श्वास घेतला. या दुर्दैवी घटनेने होले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटने प्रकरणी नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. इंदिरानगरमधील हृदयद्रावक घटनेनंतर पोलिसांनी पालकांना काळजी घेण्याचा आवाहन केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com