kamshet police registered atrocity on two  Saam Digital
क्राईम

Maval Crime: ग्रामपंचायत सदस्येला शिवीगाळ, दाेघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं करुंज ग्रामपंचायत हद्दीत?

Karunj Grampachayat Road Demolished By Two : कामशेत पाेलिस दाेन्ही संशयित आराेपींचा शाेध घेताहेत. याबाबतची माहिती कामशेत पाेलिसांनी साम टीव्हीला दिली.

दिलीप कांबळे

करुंज गावातील ग्रामपंचयात सदस्य कल्पना कांबळे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी कामशेत पाेलिसांनी दाेघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच स्माशनभूमी आणि दलित वस्तीकडे जाणारा रस्ता खाेदल्याने शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

मावळ करुंज गावामध्ये नागरिकांनी स्मशानभूमी आणि दलित वस्तीकडे जाणारा रस्ता जेसीपीच्या साह्याने खोदला. रस्ता बंद झाल्याने ग्रामपंचायत सदस्य कल्पना कांबळे यांनी रस्ता का खोदला असा जाब विचारायला केल्यानंतर त्यांनाच शिवीगाळ करण्यात आली.

दरम्यान याच रस्त्याच्या बाजूला रस्त्यावर धुणी भांडी केली जाते. त्याचं पाणी याच कच्च्या रस्त्यावर येते. त्यामुळे तिथे चिखल निर्माण होतो. जाणे येण्यास नागरिकांना त्रास होतो. दलित वस्तीकडे किंवा एखादी गावात मयत झाली तर दुसरा स्मशानभूमी कडे जाणारा कोणताही रस्ता नाही.

हा रस्ता काँक्रीटचा करण्याकरिता ग्रामपंचायतीने ठरावही पास केला. ही जागा माझी आहे त्यामुळे मी जागा देणार नाही असा अट्टाहास त्यावेळी सुभाष लगड यांनी केला. ही जागा माझी आहे असे ते म्हणाले. मात्र अनेक प्रशासकीय दरबारी अर्ज केल्यानंतर तलाठी घटनास्थळी दाखल झाले.

तलाठ्यांच्या पुढेच साईदास पवार, अविनाश लगड यानी अश्लील शिवीगाळ केल्याबद्दल त्यांच्या विरोधात कामशेत पोलिसांत तक्रार करण्यात आली. त्यानूसार पाेलिसांनी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील संशयितांना लवकरच अटक केली जाईल अशी माहिती रवींद्र पाटील (पोलिस निरीक्षक, कामशेत) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सदाभाऊ खोत यांनी केले बाळराजे पाटलांचे समर्थन

SUV 2026: फीचर्स फुल्ल, स्टाइल कमाल! मार्केटमध्ये धुमाकूळ घालायला सज्ज 5 दमदार मिड–साईज SUV; खासियत ऐकून थक्क व्हाल

Shocking: लग्नात फोटोसेशन सुरू असताना स्टेज कोसळला, नवरा-नवरी, भाजप नेत्यासह १० जण पडले; पाहा VIDEO

Solapur News: सूचना एक कानानं ऐकली दुसऱ्या कानाने सोडली; आगार प्रमुख 'ऑन द स्पॉट सस्पेंड'

Maharashtra Politics: 2 डिसेंबरपूर्वीच राजकीय भूकंपाचा ट्रेलर! शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदेंच्या स्टेजवर|VIDEO

SCROLL FOR NEXT