Maval Water Crisis: नाणेगावातील महिलांची पाण्यासाठी भटकंती, विहिरीतील गाळ काढा; ग्रामस्थांची मागणी

Maval Latest Marathi News : इंद्रायणी नदी या गावाच्या उशाला असताना देखील नाणे गावातील ग्रामस्थांच्या घशाला कोरड असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
water scarcity in nanegaon near maval
water scarcity in nanegaon near mavalSaam Digital

मावळ तालुका हा सर्वात जास्त पर्जन्यमान असणारा तालुका समजला जातो. मात्र तीव्र उन्हाच्या झळांनी मावळ तालुक्यात देखील पाण्याची टंचाई आता भासू लागली आहे. मावळ तालुक्यात मोठी आणि छोटी अशी मिळून 11 धरणे असूनही नाणे गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

नाणे गावातील ग्रामस्थ पाण्याच्या समस्येने हैराण झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा केला जातो. परंतु पाणी पुरवठा दूषित होत असल्याने गावातील नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. यालाच पर्याय म्हणून गावातील पुरातन विहिरीतून पाणी घेण्यास गावकऱ्यांनी सुरुवात केली.

water scarcity in nanegaon near maval
Pune Accident : पुण्यात भीषण अपघात, एक महिन्याच्या बाळाचा मृत्यू; आईसह दूसरे बाळ जखमी

दरम्यान विहिरीचे देखील पाणी अस्वच्छ आहे. विहिरीतील गाळ न काढल्यामुळे आता गावकऱ्यांना अस्वच्छ पाणीच प्यावे लागत आहे. वारंवार ग्रामपंचायतीला मागणी करून देखील स्वच्छ पाण्याचा पुरवठा होत नसल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. इंद्रायणी नदी या गावाच्या उशाला असताना देखील नाणे गावातील ग्रामस्थांच्या घशाला कोरड असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Edited By : Siddharth Latkar

water scarcity in nanegaon near maval
Sangli: कवठेमहांकाळ रुग्णालयासह पाेलिस ठाण्यात नांगोळे ग्रामस्थांचे आंदाेलन, युवकास मारहाण केल्याचा पाेलिसांवर आराेप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com