Vishal Gawli death case Sensational claim by his lawyers  Saam Tv News
क्राईम

Vishal Gawali : विशाल गवळीने आत्महत्या केली नाही; जेलमध्येच त्याची हत्या झालीय, वकिलांचा धक्कादायक दावा

Vishal Gawali Suicide Case : विशाल गवळीने आत्महत्या केल्याची बातमी कळताच मृत मुलीच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केलं. मुलीच्या वडिलांनी आपल्या लेकीच्या फोटोला हार घालत आणि त्याच्यासमोर दिवा लावून पूजा केली.

Prashant Patil

कल्याण : कल्याणच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी तुरूंगात असलेला नराधम विशाल गवळी या आरोपीने आत्महत्या केली आहे. गवळीने कारागृहातच पहाटेच्या सुमारास गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, त्याचवेळी विशाल गवळी याच्या वकिलांनी एक धक्कादायक दावा केला आहे. विशाल गवळी आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

विशाल गवळीने आत्महत्या केल्याची बातमी कळताच मृत मुलीच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केलं. मुलीच्या वडिलांनी आपल्या लेकीच्या फोटोला हार घालत आणि त्याच्यासमोर दिवा लावून पूजा केली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, 'आमच्या दीदीसोबत नराधमाने जे कृत्य केलं, त्यासाठी आम्ही कोर्टात लढत होतो. विशाल गवळीने जे काही कृत्य केलं होतं, त्याची शिक्षा त्याला देवाने दिली. त्याच्यासोबत 'जशास तसा' न्याय झाला. यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. पोलिसांनीही आम्हाला खूप सहकार्य केलं आणि पाठिंबा दिला. मी त्यांचाही आभारी आहे. प्रशासनाने चांगले काम केले आहे', असं पीडित मुलीच्या वडिलांनी म्हटलं आहे.

यावेळी त्यांनी विशाल गवळीचे कुटुंबीय अजूनही कल्याणमध्ये दहशत पसरवत असल्याचा आरोप केला. 'विशाल गवळी याचे दोघेही भाऊ तडीपार आहेत. ते या परिसरात दहशत निर्माण करायचा प्रयत्न करत असतात. त्यांच्याकडे हत्यारं आहेत. विशाल गवळी याचे वडीलही गुन्हेगारी वृत्तीचे आहेत. ते आमच्या कुटुंबावर हल्ला करु शकतात', अशी भीती मुलीच्या वडिलांनी बोलून दाखवली.

विशाल गवळी याने तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आल्यानंतर कल्याण पूर्वेला पीडित मुलगी राहत असलेल्या परिसरामध्ये अनेक बॅनर्स लावण्यात आले आहेत. मिस यू दीदी, नराधमाला फाशी झालीच पाहिजे, असा मजकूर या बॅनर्सवर लिहण्यात आला आहे. दरम्यान, विशाल गवळी याने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणात मोठा ट्विस्ट येऊ शकतो असं बोललं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

SCROLL FOR NEXT