Crime google
क्राईम

Badlapur Crime: बदलापूरमध्ये गुंडगिरीचा कहर! तरुणावर टोळक्याचा कोयता, तलवारीने हल्ला

Crime News: बदलापूरमध्ये मध्यरात्री विशाल राठोड या तरुणावर हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. उल्हासनगरच्या गायकवाड पाड्यातील विशालवर बदलापूर पूर्व भागात जीवघेणा वार करण्यात आला, हादरवून टाकणारी घटना.

Dhanshri Shintre

बदलापूरमध्ये एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशाल राठोड (उल्हासनगर, गायकवाड पाडा) या तरुणावर मध्यरात्री बदलापूर पूर्व भागात काही हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विशालवर सध्या खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

विशाल राठोड याचा बदलापूरमधील आप्या धांडेसोबत वाद होता. याच वादातून आप्या धांडेसह त्याच्या साथीदारांनी रविवारी रात्री बदलापूर पूर्वेतील ग्रामीण रुग्णालय परिसरात विशालला गाठले आणि कोयता, तलवारी, लोखंडी रॉडसारख्या घातक शस्त्रांनी त्याच्यावर हल्ला चढवला. या मारहाणीत विशालच्या डोक्यावर कोयत्याने खोल वार करण्यात आला, ज्यामुळे त्याची कवटी फुटल्याचे सिटीस्कॅन रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले आहे.

या घटनेनंतर बदलापूर पूर्व पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून आरोपींच्या शोधासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. आप्या धांडे हा पूर्वीपासून गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून, तो सोशल मीडियावर रिल्स तयार करून नागरिकांना धमकावणे, दमदाटी करणे यांसारख्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये गुंतलेला असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याने एक टोळी तयार करून अनेक गुन्हेगारी घटना घडवल्याचा संशय असून, त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर आणि त्याच्या साथीदारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

बदलापूर पूर्व पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर आणि पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, या हल्ल्यातील आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांकडून कठोर कारवाई सुरू असून, बदलापूरमधील संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्याचे आमचे लक्ष्य आहे. सध्या विशाल राठोडची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यामुळे बदलापूरमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांच्या पुढील कारवाईकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad Live : जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ

Modi Government: मोदी सरकारच्या प्रशासकीय रचनेत मोठे बदल; राजभवनांसह PMOचं नाव बदललं

मतदान केंद्राबाहेर छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी|VIDEO

Wedding Varat Ritual: लग्नानंतर नवरा आणि नवरीची वरात का काढतात?

Sangli: पाटलांच्या समर्थकांचा राडा, मतदान केंद्राबाहेर भाजप- राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची हाणामारी; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT