Robbery CCTV Video Saam Tv
क्राईम

Robbery CCTV Footage:धक्कादायक! मालकाच्या डोळ्यादेखत दरोडेखोरांनी लुटलं दागिन्यांचं दुकान, हैद्राबादमधील थरारक Video होतोय व्हायरल

CCTV Video Of Robbery: दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. चोरींच्या घटनांनी नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. हैदराबादमध्ये दिवसाढवळ्या सोन्याच्या दुकानात चोरी झाली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Hyderabad Jewellery Shop Robbery CCTV Video:

दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अनेक लोकांच्या घरात, दुकानात चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. चोरीचे अनेक व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हैदराबादमध्ये एका सोनाराच्या दुकानात चोरी झाली आहे. (Jewellery Shop Robbery)

हैदराबादमध्ये भरदिवसा एका सोने-चांदीच्या दुकानात चोरी झाली आहे. दुकान मालकाच्या डोळ्यादेखत ही चोरी करण्यात आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. (latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबाद शहरातील पट्टापागले येथील एका सोने-चांदीच्या दुकानात ही चोरी झाली आहे. मल्कपेटच्या अकबर भागात असलेल्या किशवा ज्वेलरी शॉपमध्ये ही घटना घडली आहे. दुकानातील लाखो रुपयांचे सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेली आहे. या चोरीमुळे दुकानमालकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या चोरीचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये (CCTV Footage) दिवसाढवळ्या दोन चोर घुसून चोरी करताना दिसत आहे. हेल्मेट घालून तोंड लपवून हे चोर दुकानात घुसले होते. चोरांनी दुकानमालकाला चाकूचा धार दाखवत चोरी केली आहे. चोराने सर्वप्रथम दुकानदाराला धमकावले त्यानंतर खाली पाडले. त्यानंतर चोरांनी सर्व सोन्याच्या वस्तू उचलून पिशवीत भरल्या आणि पसार झाले. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे. या सध्या या सर्व घटनेचा पोलिस तपास घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

SCROLL FOR NEXT