फॅशन ट्रेंड नेहमीच बदलत असतो. बाजारात नेहमीच नवनवीन फॅशनचे कपडे आणि विविध वस्तू येत अताता. आता देखील सोशल मीडियावर एक नवीन फॅशन ट्रेंड व्हायरल होत आहे. सँडलची ही फॅशन पाहून सर्वच व्यक्ती हैराण आहेत. कोणी अशा प्रकारे देखील फॅशन करू शकतं यावर अनेकांचा विश्वास बसत नाहीये.
मिळालेल्या माहितीनुसार सँडलच्या फॅशनसाठी ओळखला जाणारा ‘न्यूयॉर्क फॅशन वीक’ सध्या सुरू आहे. यामध्ये सर्व व्यक्ती विविध अतरंगी प्रकारचे फुटवेअर परिधान करतात. यातीलच एक विचित्र फॅशन समोर आली आहे. एका महिलेने फॅशनसाठी चक्क उंदीर पकडणाऱ्या पिंजऱ्याची निवड केली आहे.
सध्या या फॅशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तरुणीने सगळ्यांपेक्षा हटके फॅशन करण्यासाठी एक उंदीर पकडणारा पिंजरा घेतला केला आहे. या पिंजऱ्यावर तिने पायाच्या आकाराचा सोल बसवून घेतलाय. त्यावर पुढे तिने पायातील बुट बसवले आहेत. एखादी हिलची सँडल बनवावी त्याप्रमाणे तिने ही फॅशन केली आहे.
महिलेने फक्त पिंजरा घेतलेला नाही, तर तिने यामध्ये दोन उंदीर देखील पकडून बंद केले आहेत. ‘@inmyseams’ या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडीओला लाखोंच्या घरात व्ह्युव्ज मिळाले आहेत. नेटकऱ्यांनी यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातील उंदरांना रोज जेवण देखील द्यावे लागेल? कल्पनेच्या पलीकडे आहे ही फॅशन अशा कमेंट यावर आल्या आहेत.
प्रसिद्धी मिळवण्यासाठी कधी कोण काय करेल याचा काहीच नेम नाही. मनोरंजन विश्वातील अनेकजण असे स्टंट करताना पाहायला मिळतात. काही दिवसांपूर्वी सापचे बुट व्हायरल झाले होते. या बुटांना समोरच्या बाजून फना काढलेल्या सापांची डिझाइन बनवण्यात आली होती.
तसेच थंडीमध्ये पायांना गरम ठेवण्यासाठी एका व्यक्तीने स्टीलच्या चपला बनवल्या होत्या. त्या आतून पोकळ ठेवण्यात आल्या होत्या. बाहेर जाताना पोकळ जागेत पेटलेला कोळसा भरायचा आणि जायचं, असं जुगाड करण्यात आला होता. अशात सध्या उंदीर पकडणाऱ्या पिंजऱ्याच्या सँडलने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.