Crime News Saam tv
क्राईम

Crime News : अ‍ॅप्रन पकडला अन्... महिला डॉक्टरवर हल्ला; हैदराबादच्या गांधी हॉस्पीटलमध्ये रूग्णाचा प्रताप!

Female junior doctor assaulted in Gandhi hospital : हैदराबादमध्ये एका रूग्णाने महिला डॉक्टरला मारहाण केल्याचं समोर आलंय. ही घटना गांधी हॉस्पीटलमध्ये घडली असल्याचं सांगितलं जातंय.

Rohini Gudaghe

मुंबई : हैदराबादमधील गांधी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाने महिला डॉक्टरशी गैरवर्तन आणि मारहाण केल्याचा आरोप आहे. बुधवारी ९ सप्टेंबर रोजी ही घटना घडल्याचं सांगितलं जातंय. त्याला रुग्णालयातील कर्मचारी आणि इतरांनी दमदाटी करून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती टाइम्स ऑफ इंडियाच्या हवाल्यानुसार मिळतेय. पोलिसांनी सांगितलं की, रुग्णाची तपासणी केली जात असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

महिला डॉक्टरला मारहाण

रूग्णालयातील कॅज्युल्टी वॉर्डमध्ये गेलेल्या एका रूग्णाने डॉक्टरसोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. संबंधित महिला डॉक्टरने लगेच गांधी रुग्णालयाच्या अधीक्षकांना याबाबत सूचना (Hyderabad Crime News) दिली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी चिल्कलगुडा पोलिसांना कळवल्यानंतर त्यांनी या रूग्णाला ताब्यात घेतलं. त्याला झटके येत असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. त्याला पोलीस ठाण्यात आणल्यानंतरही त्याला सतत झटके येत असल्याचं पोलीस अधिकारी म्हणत आहेत.

गांधी हॉस्पीटलमधील घटना

आम्ही त्याची चौकशी करत आहोत, असं चिल्कलगुडाचे निरीक्षकांनी (Female junior doctor assaulted) सांगितलंय. तो मुशीराबादचा रहिवासी असल्याची माहिती मिळतेय. या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये असं दिसून आलंय की, संबंधित महिला डॉक्टर रुग्णाच्या जवळून जात असताना त्याने अचानक तिचा अॅप्रन पकडला. ही घटना घडली तेव्हा अनेक रुग्ण आणि रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते. तेव्हा त्यांनी तातडीने हस्तक्षेप करून त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यापूर्वी कर्मचाऱ्यांनी त्याला बेदम मारहाण केल्याचं देखील समोर आलंय.

धक्कादायक प्रकार

गांधी ज्युनियर डॉक्टर्स असोसिएशनने (Gandhi hospital) सांगितलं की, त्यांनी तातडीने हॉस्पिटलच्या अधीक्षकांना या घटनेची माहिती दिली. परिस्थिती योग्यरित्या हाताळण्यासाठी पोलीस आणि संस्थात्मक एफआयआर विलंब न लावता दाखल केले जातील, असं हॉस्पिटलच्या अधीक्षकांनी सांगितलं आहे. ज्युनियर डॉक्टर्स असोसिएशननेने एका निवेदनात या संपूर्ण प्रकाराबद्दल माहिती (crime news) दिलीय. कोलकाता डॉक्टरच्या अत्याचार प्रकरणानंतर आता ही घटना समोर आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : महिलांना गरोदर करा आणि १० लाख कमवा, प्रेग्नंट जॉब सर्विसच्या नावाखाली मोठा घोटाळा; नेमकं प्रकरण काय?

Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याने उच्चांक गाठला, १० तोळ्यामागे ११,५०० रुपयांची वाढ, वाचा आजचे भाव

Prabhas : बाईsss काय हा प्रकार! प्रभासच्या चाहत्यांनी थिएटरमध्ये लावली आग, प्रेक्षकांमध्ये उडला गोंधळ, पाहा व्हायरल VIDEO

Maharashtra Live News Update : कांजुरमार्ग पूर्व येथील इमारतीला आग

White Butter Recipe : घरच्या घरी शुद्ध आणि चविष्ट लोणी कसे बनवावे? जाणून घ्या स्टेप्स

SCROLL FOR NEXT