गुरुग्राममधील प्रसिद्ध मॉडेल दिव्या पाहुजा हत्या प्रकरणाचा वेगाने तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना २ जानेवारी रोजी रात्री उशिरा सेक्टर १४ च्या पोलीस स्टेशन परिसरात घडली. या प्रकरणी आरोपी हॉटेल मालकानं खून केल्याची कबुली दिलीय.
'या' कारणामुळं केला खून
दिव्याकडे (Divya Pahuja) हॉटेल मालक अभिजीत सिंगचे अश्लील फोटो होते. त्यावरून त्याला ब्लॅकमेल करून दिव्या त्याच्याकडून पैसे उकळत होती. ते फोटो डिलीट करण्यासाठी तो दिव्याकडे फोनचा पासवर्ड मागत होता. पण दिव्याने त्याला पासवर्ड देण्यास नकार दिला, त्यामुळं त्यानं हे पाऊल उचललं असल्याचं पोलीस चौकशीत सांगितलं. (latest crime news)
दिव्या पाहुजा खून प्रकरणात गुन्हे शाखेने हॉटेलचा मालक अभिजीत सिंग याला अटक केलीय. तसंच हॉ टेलमध्ये काम करणाऱ्याओमप्रकाश आणि हेमराज यांना अटक करण्यात आलीय. ओमप्रकाश आणि हेमराज यांनी खून केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मदत केल्याचं समोर येतंय.
घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मॉडेल दिव्या पाहुजा ही गुरुग्राममधील बलदेव नगरची रहिवासी होती. हॉटेल मालक अभिजीत आणि त्याच्या साथीदारांनी दिव्याची हत्या केल्याचा आरोप (Gurugram Crime) आहे.
मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने साथीदारांना १० लाख रुपये दिल्याची माहिती मिळतेय. त्यांनी मृतदेह निळ्या रंगाच्या BMW कारच्या ट्रंकमध्ये मृतदेह टाकून घटनास्थळावरून पळ काढला, ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय.
संदीप गाडोली एन्काऊंटर प्रकरणात मुख्य साक्षीदार
गँगस्टर संदीप गाडोली एन्काऊंटर प्रकरणात दीपिका मुख्य साक्षीदार होती. त्यामुळे तिच्या हत्येमागे गँगस्टर संदीप गाडोलीची बहीण सुदेश कटारिया आणि गँगस्टर संदीप गाडोलीचा भाऊ ब्रह्मप्रकाश यांचा हात असल्याचा आरोप दिव्याच्या कुटुंबीयांनी केलाय. त्यांनी सुदेश आणि ब्रह्मप्रकाश यांच्याविरोधात हत्येचा कट रचल्याची तक्रार दाखल केलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.