सध्या तरूणांमध्ये नैराश्याचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळं ते टोकाचं पाऊल उचलत आहेत. दिवसेंदिवस आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशीच एक घटना मुंबईतील अंधेरी परिसरातून समोर आली आहे. (latest crime news)
बुधवारी सकाळी महाविद्यालयीन विद्यार्थिनीनं निवासी इमारतीच्या 14व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. एका पोलीस अधिकाऱ्यानं ही माहिती दिलीय.
मुंबईच्या (mumbai) पश्चिम उपनगरातील अंधेरी येथील एसव्ही रोडवर असलेल्या मिलियनिअर हेरिटेज सोसायटीमध्ये ही घटना घडली (Andheri) आहे.
विधी प्रमोद कुमार सिंग ही गेल्या काही वर्षांपासून या इमारतीत पेइंग गेस्ट म्हणून राहत होती. तिचे कुटुंबीय ठाण्यात राहतात. ती विलेपार्ले येथील महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती.
इमारतीच्या वॉचमननं प्रथम तिचा मृतदेह जमिनीवर पाहिला. त्यानंतर त्याने सोसायटीच्या इतर सदस्यांना याबद्दल सांगितलं. त्यांनतर पोलिसांना सांगितल्याची माहिती मिळतेय (Mumbai Crime).
डिप्रेशनमुळं उचललं टोकाचं पाऊल
डीएन नगर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या विद्यार्थिनीनं आत्महत्या करण्यापूर्वी एक पानाची चिठ्ठी लिहिली होती. त्यावरून ती डिप्रेशनमध्ये असल्याचं स्पष्ट होतंय. त्यामुळंच तिनं हे पाऊल उचललं असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.
अपघाती मृत्यूची नोंद
याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. तिच्या कुटुंबाला याबाबत माहिती दिली आहे. या प्रकरणात आतापर्यंत काहीही संशयास्पद आढळलेलं नाही. तिच्या मृत्यूचं नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिलीय. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.