भारताला हव्या असलेल्या दहशतवाद्यांच्या पाकिस्तानात सातत्याने हत्या होत आहेत. यात आता दहशतवादी हंजला अदनान यांचही नाव जोडलं गेलं आहे. मंगळवारी रात्री अदनान याची कराचीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अज्ञात बंदुकधाऱ्यांनी घरात घुसून त्याच्यावर ४ गोळ्या झाडल्या. अवघ्या १० सेकंदातच अदनान याचा जीव गेला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
अदनान हा लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी होता. २०१५ मध्ये जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये त्याने बीएसएफच्या ताफ्यावर हल्ला करण्याची योजना आखली होती. या हल्ल्यात दोन बीएसएफ जवान शहीद झाले होते. याशिवाय १३ जवान जखमी झाले होते.
या भ्याड हल्ल्यानंतर भारतीय गुप्तचर यंत्रणांनी अदनान याचं लोकेशन ट्रेस करण्यास सुरुवात केली होती. तो पाकिस्तानमध्ये लपून बसल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांना मिळाली होती. रिपोर्टनुसार, अदनान हा २६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड लष्कर प्रमुख हाफिज सईदच्या जवळचा मानला जात होता.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, रविवारी मध्यरात्री अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हंजला अदनान याच्यावर राहत्या घरी गोळीबार केला. त्याच्यावर एकूण ४ गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबारात तो गंभीर जखमी झाला. दरम्यान, अदनान यांच्यावरील हल्ल्याची माहिती मिळताच पाकिस्तानी लष्कराने घटनास्थळी धाव घेतली.
अदनान याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. ऑक्टोबर महिन्यात देखील पाकिस्तानात जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरचा जवळचा व्यक्ती दाऊद मलिक याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
दाऊद मलिकची हत्या उत्तर वजिरीस्तानमध्ये करण्यात आली होती. अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. दाऊद मलिक पुलवामा हल्ल्यामध्ये सामील होता. दाऊद मलिकच्या हत्येनंतर मुंबईच्या २६/११ हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईदही धक्क्यात असल्याचं सांगितलं जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.