- सचिन कदम
पेणे येथे अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार करुन तिचा खून केल्या प्रकरणी आदेश पाटील (adesh patil) यास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अलिबाग विशेष न्यायालयाने हा निर्णय दिला. हा निकाल ऐकण्यासाठी न्यायालयात माेठी गर्दी जमली हाेती. (Maharashtra News)
डिसेंबर 2020 मध्ये रायगड जिल्ह्यातील पेण येथे तीन वर्षाच्या आदिवासी मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पाेलिसांनी आदेश पाटील यास संशयित म्हणून अटक केली हाेती.
पाेलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अलिबाग न्यायालयात आदेश पाटीलवर दाेषराेप पत्र दाखल केले हाेते. या खटल्याची सुनावणी अलिबागच्या विशेष न्यायालयात सुरू होती. या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम (advocate ujjwal nikam) यांनी काम पाहिले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
अलिबाग विशेष न्यायालयाने आदेश पाटील यास अत्याचार आणि खून प्रकरणी आदेश पाटील यास दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हा निकाल ऐकण्यासाठी न्यायालयात गर्दी जमली हाेती.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.