Konkan Railway : कोकण रेल्वेने फुकट्या प्रवाशांकडून केला २ कोटींचा दंड वसूल, धडक माेहिम सुुरुच राहणार

प्रवाशांनी वैध तिकिटावर सन्मानाने प्रवास करावा, असे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे.
konkan railway collects 2 crores 5 lakhs 52 thousand as fine from ticketless travel in a month
konkan railway collects 2 crores 5 lakhs 52 thousand as fine from ticketless travel in a monthsaam tv
Published On

Ratnagiri News :

रेल्वे गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांविरोधात कोकण रेल्वेने मोहिम सुरु केली आहे. या मोहिमे अंतर्गत एका महिन्यात 7 हजार 13 प्रकरणांमध्ये कोकण रेल्वेने 2 कोटी 5 लाख 52 हजार 446 रुपये इतका दंड वसूल केला आहे. (Maharashtra News)

फुकट्या प्रवाशांना रोखण्यासाठी रेल्वेकडून सातत्याने तिकीट तपासणीची मोहिम राबवली जात आहे. काेकण रेल्वेने दिलेल्या माहितीनूसार या मोहिमे दरम्यान गेल्या महिन्यात (नोव्हेंबर 2023) एकूण 7,013 अनधिकृत, अनियमित प्रवासी तिकीट नसलेले प्रवासी आढळून आले.

konkan railway collects 2 crores 5 lakhs 52 thousand as fine from ticketless travel in a month
Uday Samant: दीड लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येणार; उदय सामंतांचा उद्धव ठाकरेंना टाेला

त्यामुळे एका महिन्यात तब्बल रेल्वेने 2 कोटी 5 लाख 52 हजार 446 रुपये इतक्या रुपयांचा दंड वसूल केला आहे. कोकण रेल्वे आपल्या प्रवाशांना गैरसोय टाळण्यासाठी योग्य आणि वैध तिकिटांसह प्रवास करण्याचे वेळोवेळी आवाहन करीत असते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रवाशांनी वैध तिकिटावर सन्मानाने प्रवास करावा, असे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

konkan railway collects 2 crores 5 lakhs 52 thousand as fine from ticketless travel in a month
Kolhapur Crime News : कोल्हापुरात पेट्रोल पंपावर राडा, दगडफेकीत कर्मचा-यासह पोलिस गंभीर जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com