Yavatmal News : पत्नीच्या खून प्रकरणात पतीसह मैत्रिणाला जन्मठेप, दारव्हा जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली शिक्षा

सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील डी. एम. निमकर यांनी कामकाज पाहिले.
husband and girlfriend gets life imprisonment for hitting wife in yavatmal
husband and girlfriend gets life imprisonment for hitting wife in yavatmal saam tv
Published On

- संजय राठोड

Yavatmal News :

यवतमाळ जिल्ह्यात पत्नीच्या खून प्रकरणात पतीसह त्याच्या मैत्रिणीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दारव्हा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. बी. भस्मे यांनी हा निकाल दिला. आकाश दादाराव चव्हाण (वय ३०, रा. उमरी, ता. दारव्हा) व दर्शना ज्ञानेश्वर चव्हाण (वय २६, पाळोदी, ता. कारंजा) अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. निकिता उर्फ गोलू आकाश चव्हाण (वय २४) असे मृत विवाहितेचे नाव असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. (Maharashtra News)

नऊ नोव्हेंबर २०१९ च्या रात्री आकाश व दर्शना या दोघांनी निकीताला बेदम मारहाण केली हाेती. त्यात तिचा मृत्यू झाला. ही घटना दुसऱ्या दिवशी उघडकीस आली. याबाबत विवाहितेचे काका बाळू गंगाराम राठोड यांनी दारव्हा पोलिसांत फिर्याद दिली हाेती.

त्यावरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. सहायक पोलिस निरीक्षक अलका गायकवाड यांनी या घटनेचा तपास केला. त्यानंतर विवाहितेचे वडील प्रदीप गंगाराम राठोड यांनी ११ नोव्हेंबरला दिलेल्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक प्रदीप साळुंके यांनी केला.

husband and girlfriend gets life imprisonment for hitting wife in yavatmal
Nandurbar: सेविकांच्या संपामुळे 2 हजार 585 अंगणवाड्या आजही कुलूप बंद, नंदुरबार जिल्ह्यातील बालके पोषण आहारपासून वंचित

तपासादरम्यान घटनास्थळाचा पंचनामा व इन्क्वेस्ट पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. श्वास रोखल्याने मृत्यू झाल्याचा अहवाल प्राप्त झाला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यानंतर पाेलिसांनी पतीसह त्याच्या मैत्रिणीला अटक केली. पोलिस अधिकाऱ्यांनी शेजारच्या साक्षीदारांचे साक्षी नोंदविल्या. तपासाअंती दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. सरकारी पक्षातर्फे १३ साक्षीदार तपासले गेले.

न्यायालयाने अश्विनी चव्हाण, सुनीता चव्हाण व डॉक्टरांची साक्ष ग्राह्य धरली. गुणवत्तेवर आकाश चव्हाण व दर्शना चव्हाण यांना खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप व दोन हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आल्याची माहिती सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील डी. एम. निमकर यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

husband and girlfriend gets life imprisonment for hitting wife in yavatmal
Pandharpur: थंडी वाढली, पंढरपूरात हरभऱ्याची भाजी खाऊ लागली भाव; गाठला चिकनचा दर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com