Nandurbar: सेविकांच्या संपामुळे 2 हजार 585 अंगणवाड्या आजही कुलूप बंद, नंदुरबार जिल्ह्यातील बालके पोषण आहारपासून वंचित

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप कधी मिटेल याची प्रतीक्षा बालकांना आहे.
nandurbar anganwadi workers continues indefinite strike
nandurbar anganwadi workers continues indefinite strike saam tv
Published On

- सागर निकवाडे

Nandurbar News :

विविध मागण्यांच्या पू्र्ततेसाठी अंगणवाडी सेविका (Anganwadi Sevika) गेल्या 14 दिवसांपासून संपावर गेल्या आहेत. परिणामी नंदुरबार जिल्ह्यातील 2 हजार 585 अंगणवाड्या कुलुप बंद आहेत. या संपामुळे बालके पोषण आहारापासून वंचित राहू लागली आहेत. (Maharashtra News)

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात यावी आदी मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. शासनाने अद्याप अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत काेणताच निर्णय जाहीर केलेला नाही.

nandurbar anganwadi workers continues indefinite strike
Navegaon Nagzira Tiger Reserve : ताडोबातून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात आणले जाणार तीन वाघ

त्यामुळे गेल्या 14 दिवसांपासून अंगणवाडीच्या इमारती कुलूप बंद आहेत. कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यसाठी अंगणवाडी मधून विविध योजना राबविल्या जात असतात. याच ठिकाणी बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सध्या जिल्ह्यतील एकूण 2 हजार 585 अंगणवाड्या बंद आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील जवळपास पाच हजार पेक्षा अधिक कर्मचारी संपावर गेले आहेत. कुपोषण रोखण्यासाठी महत्वपूर्ण योजना असलेल्या पोषण आहाराचे वाटप संपामुळे बंद असल्याने नंदुरबार जिल्ह्यात बालकांमध्ये कुपोषण वाढण्याची भीती पालकांकडून आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

nandurbar anganwadi workers continues indefinite strike
Wardha To Mumbai Nishtha Yatra: उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ वर्धा ते मुंबई निष्ठा यात्रा : निहाल पांडे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com