Haryana Crime  Saam Tv
क्राईम

Crime: १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार, घरी जाताना अपहरण करत फ्लॅटवर नेलं अन्...; पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न

Haryana Crime: हरियाणामध्ये १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आले. गावामध्ये राहणाऱ्या तरुणांनी लिफ्ट देण्याचा बहाणा करत तिचे अपहरण केले आणि एका फ्लॅटवर नेत तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.

Priya More

Summary:

  • हरियाणामध्ये १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार

  • दोघांनी तिचे अपहरण केले

  • एका फ्लॅटवर नेत तरुणीवर आळीपाळीने बलात्कार

  • दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल

हरियाणाच्या गुरूग्राममध्ये १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. लिफ्ट देण्याचा बहाणा करत हरियाणाच्या पलवलमधून या तरुणीचे अपहरण केले आणि गुरूग्राममध्ये नेत तिच्यावर आरोपींनी सामूहिक बलात्कार केला. या घटनेनंतर तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला. तिची प्रकृती गंभीर असून रुग्णालयामध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पलवलमध्ये राहणाऱ्या दोन ओळखीच्या व्यक्तींनी १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. १७ मार्चच्या रात्री तरुणी तिच्या काकांच्या घरातून पायी चालत घरी परत येत असताना आरोपींनी तिला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने त्यांच्या गाडीत बसवले आणि गुरुग्रामला नेऊन तिच्यासोबत भयंकर कृत्य केले. दुसऱ्या दिवशी सकाळी घरी पोहोचल्यावर पीडितेने आत्महत्येचा प्रयत्न केला. पण तिच्या कुटुंबीयांनी तिला वाचवले. सध्या पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे.

पीडितेच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी सध्या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. आरोपी पीडित तरुणीच्या ओळखीतले असून ते ती राहते त्याच गावात राहतात. पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी पीडित तरुणीचे अपहरण करून तिला गुरुग्राममधील एका फ्लॅटमध्ये नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेनंतर पीडित तरुणी दुसऱ्या दिवशी घरी परत आली तेव्हा तिने गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. पण तिच्या कुटुंबीयांनी तिला वाचवले.

पीडित तरुणीला सुरुवातीला जवळच्या एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. पण तिची प्रकृती खालावल्याने तिला फरिदाबादच्या धौज येथील दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. या रुग्णालयात तिची प्रकृती गंभीर असल्याचे निदान झाल्यावर तिला नूहच्या नलहार येथील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले. सध्या तिची प्रकृती स्थिर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे हरियाणात खळबळ उडाली आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Snake Video: सापांना पळवून लावणारी छडी? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Mumbai Drug: मुंबईलाही झोम्बी ड्रग्जचा विळखा? व्हायरल व्हिडीओमुळे राज्यात खळबळ

RCB vs LSG: आरसीबीचा शानदार विजय; लखनौला चीतपट करताच बेंगळुरू संघाची पॉईंट्स टेबलमध्ये सरशी, मुंबई, केकेआरचं टेन्शन वाढलं

Maharashtra Politics: ठाकरे सेनेचं कार्याध्यक्षपद आदित्य ठाकरेंकडे? जूनमध्ये ठाकरे सेनेत मोठे बदल?

नेस्कोमध्ये तरुणाईला ड्रग्जचा 'कुरिअर डोस'; कॉन्सर्टमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT