पाटण : गुजरातच्या पाटणमधील एका गावात काही दिवसांपूर्वी घागरा आणि ब्लाउज परिधान केलेला एका वृद्धाचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला होता. त्याच्या रहस्यमयी मृत्यूनंतर परिसरात तणावही वाढू लागला. पोलिसांनी तातडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. त्यानंतर जे सत्य समोर आलं, ते धक्कादायक होतं.
गुजरातमधील या प्रकरणात जाखोत्रा गावातील २३ वर्षीय गीता आणि तिचा प्रियकर भरत लुभा अहिर यांना अटक करण्यात आली आहे. मृत व्यक्तीची ओळख ५६ वर्षीय हरजी देभा सोलंकी म्हणून झाली. चौकशीदरम्यान गीताने खुलासा केला की, तिने गावातील वृद्ध व्यक्तीला घागरा आणि चोली परिधान करून मारलं. कारण तिला असं दाखवायचं होतं की तिचा मृत्यू झाला आहे. गीताला आपल्या प्रियकरासोबत गुपचूप गाव सोडून पळून जायचं होतं.
गीता आधीच विवाहित
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गीता आधीच विवाहित होती. तिच्या पतीचं नाव सुरेश गेंगा भीमा आहे. तिला एक तीन वर्षांची मुलगीही आहे. गीता तिचा प्रियकर भरतसोबत जोधपूरला पळून जाण्याचा प्लॅन करत होती. या योजनेनुसार, दोघांनी सोलंकीला मारलं आणि त्याच्या मृतदेहाला गीताचे कपडे घालून जाळलं, जेणेकरून असं वाटावं की गीताचा मृत्यू झाला आहे. या गुन्ह्यासाठी दोघांनी सोलंकीला दारू पाजून बेशुद्ध केलं आणि नंतर त्याला जाळलं.
पतीला वाटलं गीताचा मृतदेह आहे
२७ मे रोजी सकाळी सुरेश आपल्या तीन वर्षांच्या मुलीच्या रडण्याच्या आवाजाने जागा झाला. त्याला त्याची पत्नी गीता घरात दिसली नाही. पत्नीचा शोध घेताना तो घराच्या मागे गेला, तिथे त्याला एक अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, जो पाहून त्याची पायाखालची जमीनच सरकली. तो मृतदेह नारंगी आणि जांभळ्या रंगाच्या घाघरा-चोलीत होता आणि पायात चांदीचं पैजण होतं. हे तेच कपडे होते जे त्याच्या पत्नीने परिधान केले होते. सुरेशला वाटलं की त्याच्या पत्नीने आत्महत्या केली आहे आणि त्याने पोलिसांना माहिती दिली. पण काही तासांच्या तपासानंतर प्रकरण पूर्णपणे उलटलं. पोस्टमॉर्टम अहवालातून कळलं की हा मृतदेह ५६ वर्षीय व्यक्ती हरजी देभा सोलंकीचा होता, जो वौवा गावात राहत होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.