Greater Noida dowry case x
क्राईम

Crime : बायकोला जिवंत जाळलं, अटकेनंतर पळाला; पोलिसांकडून आरोपी नवऱ्याचा एन्काऊंटर

Crime News : ग्रेटर नोएडामध्ये एकाने ३६ लाख रुपयांच्या हुंड्यासाठी त्याच्या पत्नीला जिवंत जाळले. या आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी आरोपीचा एन्काऊंटर केला.

Yash Shirke

  • ग्रेटर नोएडामध्ये ३६ लाखांच्या हुंड्यासाठी पत्नीला जिवंत जाळणारा आरोपी नवरा पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये जखमी झाला.

  • फरार आरोपी विपिनने ताब्यात असताना पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांकडून पिस्तूल हिसकावले.

  • पोलिसांनी गोळी झाडल्यानंतर तो जखमी होऊन पकडला गेला असून प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Shocking : ग्रेटर नोएडामध्ये एक धक्कादायक घटना घडली. आईसह मिळून एका व्यक्तीने त्याच्या पत्नीला जिवंत जाळले. या क्रूर कृत्यानंतर आरोपीचा दिल्ली पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तेथून पळून जाण्याचा आरोपीने प्रयत्न केला होता. तेव्हा पोलिसांनी गोळी झाडल्यानंतर आरोपी जखमी झाला आणि त्याला अटक करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, २१ ऑगस्ट रोजी ग्रेटर नोएडा येथे विपिनने त्याच्या पत्नीला, निक्कीला जिवंत जाळले. त्यानंतर निक्कीच्या बहिणीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. निक्कीच्या कुटुंबीयांना आंदोलन करत न्यायाची मागणी केल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले. या प्रकरणी निक्कीचा नवरा विपिन, तिची सासू, सासरा आणि मेहुणा यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

विपिनने त्याच्या सात वर्षीय मुलासमोर पत्नीला जिंवत जाळले होते. या घटनेनंतर आरोपी विपिन फरार झाला होता. शेजाऱ्यांच्या मदतीने निक्कीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही कारणांमुळे तिला दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेण्यात आला. पण रुग्णालयात नेत असताना वाटेतच निक्कीचा मृत्यू झाला. हुंड्यासाठी विपिन आणि त्याचे कुटुंबीय निक्कीचा छळ करत होते. ३६ लाख रुपयांच्या हुंड्यासाठी विपिनने निक्कीला जिवंत जाळल्याचे म्हटले जात आहे.

फरार विपिनला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलीस त्याला मेडिकलसाठी घेऊन जात होते. त्यादरम्यान त्याने रस्त्यात कारमधून उडी मारत पळून जाण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्याने पोलिसांकडून पिस्तूलदेखील हिसकावले होते. त्याच्या दिशेने पोलिसांनी गोळी झाडली. गोळी विपिनच्या पायावर लागली आणि तो खाली कोसळला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sarvapitri Amavasya 2025: पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सर्वपित्री अमावस्येला करा 'हे' उपाय

पाकिस्तानचाही नेपाळ होणार? भ्रष्टाचार, महागाई अन् अराजकता...जनतेच्या उद्रेकाचा सरकारनं घेतलाय धसका

Pooja Khedkar : पूजा खेडकरच्या वडिलांचा नवा कारनामा, अपहरण नाट्यावरचा पडदा अखेर उघडला

Blouse Designs: जरीच्या साड्यांवर ब्लाउज शिवताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? जाणून घ्या

Indian Currency: भारतीय नोटांच्या मागील बाजूस कोणकोणत्या भाषांचा वापर करण्यात आला आहे? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT