Tripura Crime Saam Tv
क्राईम

Shocking: आजोबाकडून १४ महिन्यांच्या नातीवर बलात्कार, हत्या करून मृतदेह शेतात पुरला

Tripura Crime: त्रिपुरामध्ये ४४ वर्षीय व्यक्तीने आपल्या १४ महिन्यांच्या नातीवर बलात्कार केला. बलात्कारानंतर आरोपीने तिची हत्या करून मृतदेह जमिनीत पुरला. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून तपास सुरू आहे.

Priya More

त्रिपुरामध्ये १४ महिन्यांच्या चिमुकलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्रिपुरामध्ये शनिवारी ही भयंकर घटना घडली. या घटनेने संपूर्ण देश हादरला. आरोपीने आधी चिमुकलीवर बलात्कार केला. नंतर हत्या करून तिचा मृतदेह जमिनीमध्ये पुरला. आरोपी मृत चिमुकलीचा आजोबा आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, त्रिपुरामध्ये ४४ वर्षीय आजोबाने आपल्या १४ महिन्यांच्या नातीवर बलात्कार केला. बलात्कारानंतर चिमुकलीची हत्या करून तिचा मृतदेह शेतामध्ये पूरला. आरोपीचे नाव जयनल उद्दीन (४४ वर्षे) आहे. रविवारी त्रिपुरा पोलिसांच्या एका टीमने आसामच्या श्रीभूमी परिसरातील नीलम बाजारमधून त्याला अटक केली.

ही घटना शनिवारी रात्री तेव्हा घडली जेव्हा चिमुकली आपल्या आईसोबत मामाच्या घरी गेली होती. शनिवारी रात्री साडेआठ वाजता चिमुकलीला तिचा आजोबा सोबत घेऊन घेऊन गेला. बराच वेळ दोघेही परत घरी आले नाही त्यामुळे घरात एकच गोंधळ उडाला. मुलगी सापडत नसल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला. पोलिसांनी रात्री उशिरा मुलीच्या आजोबाच्या घराजवळील शेतात नव्याने खड्डा खोदून तो बुझवल्याचे दिसून आले. त्यांनी ती जागा खोदून काढली तर त्यामध्ये चिमुकलीचा मृतदेह आढळून आले. यावेळी सर्वांना मोठा धक्का बसला.

मुलीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवून दिला. शवविच्छेदन अहवालातून मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी तपासाला गती आणली आणि तात्काळ आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली. आरोपीला नीलम बाजार येथून अटक करण्यात आली. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : माकडाची करामत! माकडाने पळवले वकिलाचे ५० हजार, झाडावर बसून केला नोटांचा वर्षाव, पहा Video

Famous Hill Station: कर्जत स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर आहे प्रसिद्ध हिल स्टेशन, दिवाळीच्या सुट्टीत कुटुंबासोबत नक्की भेट द्या

स्टेजवर फिल्मीस्टाइल थरार; सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी आगीत अडकलेल्या अभिनेत्रीला बाहेर काढलं, 4 दशकांपूर्वी काय घडलं होतं?

Viral : घरकाम करणाऱ्या बाईला ४५,००० हजार पगार, मालकिणीने बनवला व्हिडीओ; नेटकरी म्हणाले...

Maharashtra Live News Update: हिंदू जन आक्रोश मोर्चासाठी भाजप आमदार गोपीचंद पडळकर बीडमध्ये दाखल

SCROLL FOR NEXT