Pune Terror Alert : पुण्यात दहशतवादी घुसले? ATS सह पोलिस यंत्रणा सतर्क

Pune : पुण्यात पुन्हा एकदा दहशतवादी घुसलेत का? असा सवाल विचारला जातोय..त्यामागे कारण आहे.. कोंढवामध्ये ATS आणि पोलिसांनी केलेलं सर्च ऑपरेशन...मात्र हे ऑपरेशन नेमकं कशासाठी? जाणून घ्या.
Pune Terror Alert
Pune Terror Alert x
Published On

Pune News : रात्रीच्यावेळी जेव्हा सगळं पुणे शहर झोपेच्या आधीन झालं होतं... तेव्हाचं कोंढवा परिसराला छावणीचं स्वरुप आलं..देशविरोधी कारवाई होण्याची शक्यता असल्यानं पुणे पोलिस आणि ATS च्या पथकानं 25 ठिकाणी छापेमारी केली.. 2023 मध्ये याचं कोंढवामध्ये बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेच्या 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.. ज्यामुळे ATS ला पुन्हा त्याच भागात संशयितांचे जाळे सक्रिय असल्याचा संशय व्यक्त आला आणि त्यांनी दहशतवादी नेटवर्कचा शोध सुरु केला...

पुण्यात पुन्हा दहशतवादी?

ATS, पुणे पोलीस, केंद्रातील सुरक्षा यंत्रणांचं संयुक्त ऑपरेशन मध्यरात्री सुरु झालं.. आय लव मोहम्मद चळवळीतून पुण्याचं वातावरण दूषीत करण्याचा प्रयत्न असल्याचा एटीएसला संशय होता.. काही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आलीय...संशयिताकडून मोबाईल सीम कार्ड,लॅपटॉप, महत्त्वाची कागदपत्रंही जप्त करण्यात आलेत.. तसचं व्हिसा संपलेल्या परदेशी लोकांनाही एटीएसनं ताब्यात घेतलयं..

Pune Terror Alert
Maharashtra Politics : शिंदे गटाला मोठा झटका, मोठ्या नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

दरम्यान पीएफआय संघटनेशी संबंधित सिद्दीक याच्याही घरात ATS नं कारवाई केलीय..

मुळात कोंढवा परिसरात ठिकठिकाणी आय लव्ह मोहम्मद आणि “इस्लाममध्ये संगीत हराम आहे” अशा आशयाचे पोस्टर्स लागल्यानं समाजात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशयही ATS ला होता... त्यामुळे सर्च ऑपरेशन केलं.. याआधीही ATS नं कोंढवा परिसरातील ‘ISIS’शी संबंधित 3 दहशतवाद्यांना ताब्यात घेतलं होतं.. त्यामुळे सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या पुण्याला अशांत करण्याचा प्रयत्न नेमकं कोण करतयं? ATS आणि पोलिसांच्या चौकशीनंतर काय समोर येतं? याकडे अनेकाचं लक्ष लागलयं...

Pune Terror Alert
देश जाती, धर्मावर चालतो... संविधान मला मान्य नाही; सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचे वक्तव्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com