
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलांचे खळबळजनक विधान
मला संविधान मान्य नाही, देश जाती-धर्मावर चालतो असे वक्तव्य
खासदार निलेश लंके यांनी माध्यमांना सांगितली माहिती
CJI Bhushan Gavai Attack : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केला. त्याने गवई यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली. हे कृत्य करणाऱ्या वकिलाचे नाव राकेश किशोर असे आहे. राकेश यांच्या कृत्यामुळे देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. राकेश किशोर यांच्यावर कठोर कारवाईची मागणी होत आहे. यादरम्यान शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार निलेश लंके यांनी राकेश किशोर यांची भेट घेतली. या भेटीमुळे नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आज (९ ऑक्टोबर) निलेश लंके यांनी राकेश किशोर यांची भेट घेत त्यांची चूक समजवण्याचा प्रयत्न केला. लंके यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो, संविधानाची प्रत किशोर यांनी भेट म्हणून दिली. त्यानंतर दोघांमध्ये चर्चा झाली. भेटीनंतर लंके यांनी माध्यमांशी संवाद साधला. राकेश किशोर यांना संविधान मान्य नाही असे सांगितल्याचे लंके यांनी माध्यमांसमोर म्हटले.
'मी राकेश किशोर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आणि संविधानाची प्रत भेट दिली. पण त्यांनी मला संविधान मान्य नाही असे सांगितले. हा देश संविधानावर नाहीतर जाती-धर्मावर चालतो, असे किशोर यांनी भेटीत म्हटले. मी गांधीवादी विचारुन त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. पण भेटीदरम्यान माझ्यातला भगतसिंग जागा झाला. त्यांना ठणकावत संविधानाची मी जाणीव करवून दिली', असे निलेश लंके यांनी माध्यमांना सांगितले.
निलेश लंके म्हणाले, 'सरन्यायाधीश भूषण गवई यांनी भगवान विष्णू यांचा अवमान केला, असे राकेश किशोर यांनी मला सांगितले. त्यावर मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मी त्यांनी म्हणालो, सरन्यायाधीशपद ही देशाची खुर्ची आहे आणि त्या खुर्चीला विशेष महत्त्व आहे, मान आहे. त्याला मान द्यायला हवा. तुम्ही रस्त्यावर विरोध केला असता, तर तुमचे समर्थन केलेही असते. कोणीही देव-देवतांवर टीका करत असेल, तर रस्त्यावर विरोध करायला हवा, खुर्चीचा मान तुम्ही राखला पाहिजे होता.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.