Tripura News: खळबळजनक! त्रिपुरामध्ये तब्बल ८२८ विद्यार्थ्यांना HIV ची लागण; आतापर्यंत ४७ जणांचा मृत्यू

Tripura Shocking News: त्रिपुरामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. त्रिपुरामधील तब्बल ८२८ विद्यार्थ्यांना एचआव्हीची लागण झाली असून त्यापैकी ४७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
HIV Positive
Tripura NewsGoogle
Published On

त्रिपुरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. त्रिपुरामध्ये तब्बल ८२८ विद्यार्थ्यांना एचआव्हीची लागण झाली आहे. तर ४७ विद्यार्थ्यांचा एचआव्हीमुळे मृत्यू झाला आहे. हे विद्यार्थी त्रिपुरामध्ये २२० शाळा आणि २४ महाविद्यालयातील आहे.त्रिपुरामधील घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण देशात चिंतेचे वातावरण परसले आहे.

त्रिपुरा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. त्रिपुरामध्ये तब्बल ४७ विद्यार्थ्यांचा एचआयव्हीमुळे मृत्यू झाला आहे तर ८२८ विद्यार्थ्यांची एचआव्ही टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

त्रिपुरा स्टेट एड्स कंट्रोलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत जवळपास ८२८ विद्यार्थी एचआव्ही पॉझिटिव्ह आहेत. त्यापैकी फक्त ५२७ विद्यार्थी जिवंत आहे. ४७ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे विद्यार्थी देशभरातून त्रिपुरामधील नामांकित शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी आले होते.

HIV Positive
Gaza Airstrikes Israeli: गाझामध्ये इस्रायलचा एअर स्ट्राइक; लहान मुले, महिलांसह २० जण मृत्युमुखी, भयंकर दृश्ये

त्रिपुरामध्ये २२० शाळा, २४ महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील विद्यार्थी ड्रग्जच्या आहारी गेले आहेत. हे विद्यार्थी ड्रग्जचे सेवन करतात, असंही TSACS ने सांगितले. त्रिपुरामध्ये मे २०२४ पर्यंत एकूण ८,७२९ एचआव्ही पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद होती. त्यापैकी ५,६७४ लोक जिवंत आहेत. यात ४,५७० पुरुष, ११०३ महिला यांचा समावेश आहे, असंही त्यांनी सांगितले.

एचआव्ही म्हणजे ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरल. एचआव्ही या विषाणूमुळे एड्स होते. यामुळे तुमच्या रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती चांगली असते तेव्हा तो व्यक्ती अनेक विषाणूंवर नियंत्रण ठेवू शकतो. परंतु एचआयव्ही झाल्याने अनेकांची रोगप्रतिकारशक्ती कमी होती. हा आजार दिवसेंदिवस वाढत जातो. यात त्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यूदेखील होऊ शकतो. अजूनपर्यंत एचआव्हीवर प्रभावी इलाज नसल्याने मृत्यू होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढ आहे.

HIV Positive
PM मोदींना रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान, पुतीन यांनी 'ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल'ने केलं सन्मानित

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com