gold jewellery worth rs 30 lakhs saved being stealing in wardha Saam Digital
क्राईम

Wardha: सराफाच्या सतर्कतेने साेनं नाण्यासह 30 लाखांची बॅग चाेरीचा डाव फसला; युवकाच्या करामती CCTV मध्ये कैद

gold jewellery worth rs 30 lakhs saved being stealing in wardha : तुमचे काही चोरीला गेले नाही, तुम्ही तक्रार का करता असे म्हणत पुलगाव पाेलिसांनी घटनेची तक्रार नाेंदविण्यास स्वारस्य दाखविले नाही. पोलिसांची भूमिका शहरात चर्चेचा विषय ठरली आहे.

Siddharth Latkar

- चेतन व्यास

वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव येथे सोनाराच्या सतर्कतेने मोठी घटना टळलीय. सकाळी ज्वेलरी दुकान उघडायला आलेल्या सोनाराची बॅग अज्ञात चोरट्याने पळवली. व्यापाऱ्याच्या लक्षात येताच त्याने पाठलाग करत बॅग चोरट्याकडून हिसकवली मात्र चोरटे दुचाकीने पसार झाले. ही घटना परिसरातील सिसिटीव्हीत कैद झालीय.

पुलगाव येथील महावीर चौकातील प्रमोद रामभाऊ काळे या सराफाच्या दुकानातील ही घटना आहे. सकाळी आठ वाजता दुकानसमोर एक पिवळा लेडीज गाऊन घालून एक युवक आला. त्याने दुकानातील कुलूपमध्ये फेविक्विक टाकत एक माचिसची काडी टाकली व तो निघून गेला. जेणेकरून दुकानदार आल्यावर त्याला कुलूप उघडायला वेळ लागेल.

दहा वाजता कपडे बदलून युवक त्याच ठिकाणी परत आला. दुकान मालक श्रेयस काळे हा दहा वाजताच्या सुमारास दुचाकीने बॅग घेऊन आला व बॅग दुचाकीवर लटकावून दुकानाचे कुलूप उघडत होता. मात्र दुकानाचे कुलूप हे उघडत नव्हते याचदरम्यान त्याची दुचाकीला लागून असलेली बॅग चोरट्याने संधीचा फायदा घेत पळवली.

बॅग पळवून युवक आपल्या साथीदारसोबत दुचाकीवरून जातं असतांना श्रेयसला बॅग पळविल्याचे लक्षात आले. श्रेयसने आरडाओरड करत चोरट्यांकडून बॅग हिसकावली मात्र चोरटे घटनास्थळावरून पसार झाले. या बॅगेत सोने व रोख असा एकूण 30 लाखांचा मुद्देमाल होता श्रेयस यांच्या सतर्कतेने माेठी चाेरीची घटना टळली. ही घटना परिसरातील सिसिटीव्हीत कैद झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT