Symbolic image: A tragic love story in Rajasthan ends in suicide after alleged contract killing threat by girlfriend. saam tv
क्राईम

केतन-सिया प्रकरणाच्या अगदी उलट, पण भयंकर घटना! साखरपुड्यानंतर गर्लफ्रेंडनंच दिली बॉयफ्रेंडची सुपारी

Girlfriend Hired Killers After Engagement In Rajasthan: राजस्थानमध्ये साखरपुड्यानंतर प्रेयसीने प्रियकराला संपवण्यासाठी सुपारी दिल्याचा धक्कादायक आरोप. मानसिक तणावातून प्रियकराची आत्महत्या; पोलिस तपास सुरू.

Omkar Sonawane

राजस्थानच्या टोक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जी मागच्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली केतन अग्रवाल आणि सिया गोयल प्रकरणापेक्षा पूर्णपणे उलटी आहे. या प्रकरणात एक एका प्रेयसीने तिचे लग्न जमल्यानंतर आपल्या प्रियकरापासून सुटका करून घेण्यासाठी थेट त्याला जीवे मारण्याची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुंडांची भीती आणि प्रचंड मानसिक तणावामुळे अखेर जयपूरमध्ये राहणाऱ्या प्रियकराने टोक येथील आपल्या मामाच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.

ही दुर्दैवी घटना जगदीश नगर येथे घडली असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 वर्षीय मृत तरुणाचे नाव मनोज मामा असे आहे. मनोजचा भाऊ पंकज नामा याने पोलीस आणि प्रसारमाध्यमांना सांगितले की, मनोजचे एका तरुणीसोबत गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र नुकताच त्या तरुणीचा साखरपुडा दुसऱ्या एका मुलासोबत ठरला होता. तेव्हापासून मनोज आणि तरुणीमध्ये वाद सुरू झाले. घटनेच्या एक दिवस आधीही त्यांच्यात जोरदार भांडण झाले होते.

तरुणीकडून मिळालेल धोका आणि सततच्या वादांमुळे मनोज प्रचंड मानसिक तणावामध्ये होता. थोडक्यात काय तर लग्न ठरल्यानंतर प्रियकराला रस्त्यातून हटवण्यासाठी एका प्रेयसीने गुंडांना सुपारी दिली. या त्रासाला कंटाळून आणि मानसिक तणावातून तरुण प्रियकाराने आपले जीवन संपवले. पोलिस आता या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies : नवीन कपडे पहिल्यांदा धुतल्यानंतर रंग जातो? 'हे' उपाय घरच्या घरी करा ट्राय

Natural Pink Glow: कश्मिरी मुलींसारखा नॅचरल गुलाबी ग्लो पाहिजे? मग घरीच तयार केलेला हा फेसपॅक नक्की वापरा

Maharashtra News Live Update: परभणी शहरातील रस्त्यांसह महामार्गांचीही दुरवस्था, नागरिकांचे प्रचंड हाल

भाजपचा विधानसभेसाठी मास्टरप्लॅन! राज्यपातळीवर पक्षात मोठे बदल; कोणाची कुठे नियुक्ती?

Accident: भाविकांवर काळाचा घाला, भरधाव ट्रकची कारला धडक; ६ मित्रांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT