Bribe Case : मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नोंदणीसाठी घेतली लाच; महसूल अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं

Ambernath Revenue Officer Bribe Case News : अंबरनाथ तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारीने सातबारा उताऱ्यावर वारस नोंदणीचे काम करून देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारली. लाच स्वीकारताना ठाणे एसीबीने रंगेहाथ पकडले.
AMBARNATH REVENUE OFFICER ESHWAR JADHAV CAUGHT ACCEPTING ₹20,000 BRIBE IN THANE ACB TRAP
AMBARNATH REVENUE OFFICER ESHWAR JADHAV CAUGHT ACCEPTING ₹20,000 BRIBE IN THANE ACB TRAPAI Image
Published On
Summary
  • अंबरनाथमधील ग्राम महसूल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

  • सातबारा उताऱ्यावर वारस नोंदणीचे काम करून देण्यासाठी लाचेची मागणी

  • तलाठी कार्यालयात सापळा रचून ठाणे एसीबीने कारवाई केली

  • अंबरनाथमध्ये खळबळ

अंबरनाथमधून मोठी बातमी समोर आली आहे. तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी ईश्वर जाधव (Ambernath Revenue Officer Ishwar Jadhav) यांना २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB ) रंगेहात पकडल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून शुक्रवारी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे नागरिकांच्या हक्काच्या कामांसाठीही लाचेची मागणी होत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या वडिलांच्या निधनानंतर वारस म्हणून सावत्र बहिणीचे नाव सातबारा उताऱ्यावर नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. हे काम पूर्ण करून देण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी ईश्वर जाधव यांनी स्वतःसाठी १० हजार रुपये आणि मंडळ अधिकाऱ्यासाठी १० हजार रुपये अशी एकूण २० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रारदाराने ठाणे एसीबीकडे तक्रार दाखल केली होती.

AMBARNATH REVENUE OFFICER ESHWAR JADHAV CAUGHT ACCEPTING ₹20,000 BRIBE IN THANE ACB TRAP
Monsoon Rain Alert : महाराष्ट्रात काही तासांत मान्सूनची एंट्री, 'या' जिल्ह्यांना अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीने संपूर्ण प्रकरणाची पडताळणी केली. चौकशीत लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचला. त्यानुसार द्वारली येथील तलाठी कार्यालयात तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना ईश्वर जाधव यांना रंगेहात अटक करण्यात आली. कारवाईदरम्यान लाचेची संपूर्ण रक्कम जप्त करण्यात आली असून त्यांचा मोबाईल फोनही तपासासाठी ताब्यात घेण्यात आला आहे. याशिवाय त्यांच्या राहत्या घराची झडतीही घेण्यात आली.

AMBARNATH REVENUE OFFICER ESHWAR JADHAV CAUGHT ACCEPTING ₹20,000 BRIBE IN THANE ACB TRAP
Shocking : संभाजीनगर हादरलं! नोकरीचं आमिष देत शिक्षिकेचं धर्मांतर, हॉटेलमध्ये नेत केले अत्याचार

या घटनेनंतर महसूल विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून अंबरनाथ तालुक्यात सातबारा आणि फेरफार नोंदणीची अनेक कामे प्रलंबित असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. नागरिकांना वारंवार कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत असून कामांमध्ये होत असलेल्या विलंबामुळे नाराजी वाढली आहे. दरम्यान, या प्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास ठाणे एसीबीकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com